Homeताज्या बातम्या

महिला भाविकाची हरवलेली पर्स प्रामाणिकपणे परत

श्रीक्षेत्र माहूर गडावरील  चे पत्रकार संजय घोगरे यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत नागपूर येथील एका महिला भाविकाची हरवलेली पर्स परत केली.नागपूरच्या

निस्वार्थ सेवा आणि सामाजिक बांधिलकीमुळेच ’तुलसी’ ला यश मिळाले; पुज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचे प्रतिपादनतुलसी फॅशन कॉलेजच्या नूतन वास्तू व ’तुलसी क्रिएशन’ शोरूमचे दिमाखात उद्घाटन संपन्न
शिक्षणाच्या जोरावर मिळवले यशकु. निशिगंधा ओगलेची मंत्रालयात लिपिक पदावर निवड
धर्मभूषण ड. दिलीप ठाकूर यांच्या कायापालटचे 75 महिने पूर्ण; 3700 हून अधिक बेसहारांना नवजीवन


श्रीक्षेत्र माहूर गडावरील  चे पत्रकार संजय घोगरे यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत नागपूर येथील एका महिला भाविकाची हरवलेली पर्स परत केली.
नागपूरच्या  माधुरी पळसेकर या आपल्या मुलीसह रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूर येथे आल्या होत्या. दर्शनानंतर त्या संत गुलाब बाबा हॉटेलमध्ये चहासाठी थांबल्या असता त्यांची मंगळसूत्र, महत्त्वाची कागदपत्रे व अन्य साहित्य असलेली पर्स तेथेच विसरली. हॉटेलचे कर्मचारी व संचालक संजय घोगरे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी पर्स सुरक्षित ताब्यात घेत मंदिर व्यवस्थापनालाही माहिती दिली. दरम्यान, शहरातील लॉजवर पोहोचल्यानंतर पर्स हरवल्याचे लक्षात येताच श्रीमती पळसेकर घाबरून पुन्हा गडावर आल्या. चौकशीदरम्यान संजय घोगरे यांनी त्यांना ओळखून हॉटेलमध्ये बोलावले व पर्समधील सर्व साहित्याची खातरजमा करून ती सुखरूप परत केली. या प्रामाणिकपणाबद्दल श्रीमती पळसेकर यांनी संजय घोगरे, हॉटेल कर्मचारी तसेच माहूरकरांचे आभार मानले. त्यांच्या या कार्याचे मंदिर व्यवस्थापन समिती, व्यावसायिक, भाविक व नागरिकांकडून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. धोंड्याच्या महिन्यामुळे माहूर गडावर भाविकांची मोठी गर्दी होत असून भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस बंदोबस्ताची मागणीही यावेळी करण्यात येत आहे.

COMMENTS