Homeताज्या बातम्या

शेतकर्‍यांनी सावधगिरी बाळगून पेरणी करावीमुख्यमंत्री फडणवीस: ड्रग्जविरोधी मोहीम तीव्र सुरू

मुंबई : यंदाच्या मान्सून हंगामाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात सरासरीच

वन्यप्राणी-मानवी संघर्ष टळण्यासाठी 664 पाणवठ्यांची निर्मिती
वादळी वार्‍याने आनंददायी माध्यमिक निवासी आश्रमशाळेचे पत्रे उडाले; लाखो रुपयांचे नुकसान
जनावरांचे बाजारासह बैलगाडी शर्यती थांबल्याच पाहिजेत : आ. बाळासाहेब पाटील


मुंबई : यंदाच्या मान्सून हंगामाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात सरासरीच्या सुमारे 92 टक्के पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, त्यामुळे शेतकर्‍यांनी सावधगिरी बाळगून पेरणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी केले. मराठवाडा, पश्‍चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील काही भाग तसेच दुष्काळग्रस्त पट्ट्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य आणि देशभरात अमली पदार्थांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून या अवैध व्यवसायाची संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री ऊर्शींशपवीर ऋरवपर्रींळी यांनी स्पष्ट केले. विविध तपास यंत्रणांच्या समन्वयातून माहिती संकलित करून मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू असून, अंमली पदार्थांच्या जाळ्याची पाळेमुळे खणून काढली जातील, असा इशाराही त्यांनी दिला. मुंबई येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, अंमली पदार्थांविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या अवैध व्यापारामागील सूत्रधार, तस्कर आणि त्यांच्या जाळ्यावर कठोर कारवाई सुरू असून आगामी काळातही ही मोहीम अधिक वेगाने राबविण्यात येणार आहे.
पावसावर बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, कमी पावसामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये, यासाठी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य वेळी पेरणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. कमी पावसाच्या परिस्थितीतही शेतकर्‍यांचे नुकसान मर्यादित राहावे यासाठी शासन विविध उपाययोजना आखत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात प्रोत्साहन दिल्या जात असलेल्या ‘ई-85’ या इथेनॉल मिश्रित इंधनाचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला होऊ शकतो, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. इथेनॉल उत्पादनात महाराष्ट्र देशातील अग्रगण्य राज्यांपैकी एक असल्याने ऊस उत्पादकांसह इतर शेतकर्‍यांनाही याचा फायदा मिळू शकतो, असे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारकडून इंधनात इथेनॉलचे प्रमाण वाढविण्यास प्रोत्साहन दिले जात असून भविष्यात शंभर टक्के इथेनॉलवर चालणार्‍या वाहनांच्या वापरालाही चालना मिळणार आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राला नवे बाजारपेठीय पर्याय उपलब्ध होतील आणि शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लागेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
इंधन दरवाढीवरून शरद पवारांना प्रत्युत्तर
इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमतींवरून केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जागतिक परिस्थितीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, विविध देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षजन्य परिस्थितीचा परिणाम ऊर्जा क्षेत्रावर होत असून पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती अनेक देशांत वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेचा अप्रत्यक्ष संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की, ही केवळ स्थानिक नव्हे तर जागतिक आर्थिक घडामोडींशी संबंधित समस्या आहे. तरीही केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून योग्य वेळी आवश्यक निर्णय घेतले जातील.

COMMENTS