Homeताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर माऊली दादांचे नाव घेतल्याने पुण्यवंत होता येते; महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे प्रतिपादन

बीड: संत ज्ञानेश्वर माऊली दादांचे नाव घेतल्याने पुण्यवंत होता येते, असे प्रतिपादन श्री ह भ प महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी केले. श्री क्षेत्र

गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन
पिकविमा व सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत शेतकरी हक्क मोर्चाचा संघर्ष सुरूच राहणार; म्हासापूर येथे शासन निर्णयाची होळी
अमृतवाहिनी पॉलिटेक्निकचा उत्कृष्ट निकाल; ८३ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण, ६२४ विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी

बीड: संत ज्ञानेश्वर माऊली दादांचे नाव घेतल्याने पुण्यवंत होता येते, असे प्रतिपादन श्री ह भ प महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी केले. श्री क्षेत्र चाकरवाडी येथे विसाव्या शतकातील महान संत विभूती ज्ञानेश्वर महाराज दादा माऊली चाकरवाडीकर यांच्या २६ व्या पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प गुंफताना ते बोलत होते.

यावेळी श्री ह भ प महादेव महाराज तात्या चाकरवाडीकर, श्री ह भ प नारायण भाऊ उत्रेश्वरपिंपरी, श्री ह भ प रामकृष्ण महाराज रंधवे बापू, मृदंगमहामेरू राम महाराज काजळे, प्रा. नाना महाराज कदम, सुरेश महाराज जाधव, रामेश्वर महाराज मुरकुटे, दिनेशानंद महाराज काळे यांच्यासह हजारो भाविक भक्त उपस्थित होते.

अखंड हरिनाम सप्ताहाचा थाटात प्रारंभ

बीडच्या श्री क्षेत्र चाकरवाडी येथे २६ व्या पुण्यतिथी निमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे. यात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प गुंफताना महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी संत तुकाराम महाराजांच्या ‘नाम संकीर्तन साध पै सोपे। जळतिल पापे जन्मांतरिची ॥’ या प्रसिद्ध अभंगावर सुंदर चिंतन मांडले. पुढे बोलताना ते म्हणाले की, भवसागररूपी समुद्रातून तारून नेण्याचे काम दादा माऊलींसारखे संत करतात. कलियुगामध्ये हरी कीर्तन हेच देवप्राप्तीचे आणि पापमुक्तीचे सर्वात सोपे साधन आहे. अनंत जन्माची पापे केवळ नाम घेताच जळून जातात.

एकचित्त करून आवडीने देवाची भक्ती करावी आणि ‘राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा’ या मंत्राचा सर्वकाळ जप करावा, असा उपदेश त्यांनी केला. देवाचे नाव मुखात येण्यासाठी अनंत जन्माचे पुण्य असावे लागते, असे सांगत त्यांनी दादा माऊलींच्या आठवणींना उजळा दिला. संत बंकट स्वामी महाराज संस्थान आणि चाकरवाडी संस्थान या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून ही मोठी परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले. मेंगडे महाराजांनी माऊली दादांच्या काळातील अनेक प्रसंग सांगताच संपूर्ण कीर्तन मंडप भाविक भक्तीत तल्लीन झाला होता.

या प्रसंगी गायन सम्राट बिभीषण महाराज कोकाटे, माऊली महाराज औटी, हरिभाऊ महाराज काळे, ओंकार महाराज जगताप, अभिमान महाराज ढाकणे, सतीश महाराज जाधव, आदित्य महाराज पवार, कैलास महाराज मुरकुटे, बाबासाहेब महाराज शिंदे यांच्यासह माऊली दादांच्या फडावरील सर्व टाळकरी, गायक आणि

COMMENTS