Homeताज्या बातम्या

राहुरी-शनिशिंगणापूर प्रस्तावित रेल्वेमार्गाविरोधात शेतकरी आक्रमक! कृती समिती स्थापन करणार; आ. प्राजक्त तनपुरे करणार नेतृत्व

अहिल्यानगर: प्रस्तावित राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रित भूमिका निश्चित करण्यासाठी उंबरे येथे स

पाडळी भिल्ल वस्तीतील २० मुलांना शिक्षणाची नवी दिशा; एकलव्य भिल्ल समाज संघटनेचा स्तुत्य उपक्रम
ऑफिसच्या वेळेत अधिकारी-कर्मचारी गायब! शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; कडक कारवाईची मागणी
बीड शहरातील वीज समस्यांवर अ‍ॅड. संध्याताई राजपूत यांनी अधीक्षक अभियंत्यांची घेतली भेट

अहिल्यानगर: प्रस्तावित राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रित भूमिका निश्चित करण्यासाठी उंबरे येथे सर्व बाधित शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत रेल्वेमार्गाविरोधात व्यापक कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रत्येक गावातून पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन प्रतिनिधी निवडून कृती समिती स्थापन करण्याची सूचना आमदार तनपुरे यांनी बैठकीत केली.

बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार तनपुरे म्हणाले की, प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार असून, काहींच्या शेतीचे दोन तुकडे होणार आहेत. या परिसरात कोणतीही मोठी औद्योगिक वसाहत किंवा रोजगारनिर्मितीचा प्रकल्प नसताना केवळ रेल्वेमार्गासाठी सुपीक शेतीचे नुकसान करणे योग्य ठरणार नाही. विकासासाठी आवश्यक आणि लोकहिताचा प्रकल्प असता, तर त्याला विरोध केला नसता; मात्र शेतकऱ्यांचे नुकसान करणारा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

या विषयावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन बाधित शेतकऱ्यांची भूमिका मांडण्यासाठी शिष्टमंडळ नेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आवश्यकतेनुसार मुंबई तसेच दिल्ली येथेही तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी बैठकीस तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव ढोकणे, सुनील अडसूरे, विजय बानकर, राजेंद्र ढोकणे, भागवत देशमुख, डॉ. राजेंद्र बानकर, संचालक डॉ. माऊली दरंदले, धनंजय, वसंत कुसळकर, व्ही. एम. दरंदले, एस. बी. शेटे, शेतकरी संघटनेचे नेते अनिल निमसे, रामेश्वर कुसळकर यांच्यासह विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“रेल्वे प्रकल्प उभारणीसाठी कोणत्याही शेतकऱ्यांनी आपल्या बागायती शेतीमध्ये साहित्य ठेवण्यासाठी ठेकेदारास जागा देऊ नये. या लढ्यात शेतकऱ्यांनी माझ्या पाठीशी उभे राहावे, तुरुंगात जाण्याची वेळ आल्यास सर्वात आधी पुढे प्राजक्त तनपुरे असेल. एखादा मोठा उद्योग आला असता तर आम्ही विरोध केला नसता, मात्र बागायती जमिनी उध्वस्त करणाऱ्या या प्रकल्पाविरोधात मी स्वतः रेल्वे कृती समितीचे नेतृत्व करणार आहे.”

— आ. प्राजक्त तनपुरे

COMMENTS