Homeकृषी

शेतकर्‍यांनी रोखला महामार्ग; अंबाजोगाई-लातूर वाहतूक विस्कळीत; हजारो शेतकर्‍यांच्या आंदोलनाने प्रशासनाचे वेधले लक्ष

अंबाजोगाई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी, खरीप हंगाम २०२५-२६ मधील अतिवृष्टीमुळे

TET पेपरफुटीवरून मुंबईत उग्र आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची युवक काँग्रेसची मागणी
ठाणे जमीन गैरव्यवहार
हिंदू खाटीक समाजासाठी कर्ज व अनुदान योजनांसाठी अर्ज मागविले; नांदेड जिल्हा कार्यालयाचे आवाहन

अंबाजोगाई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी, खरीप हंगाम २०२५-२६ मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी घोषित केल्याप्रमाणे किमान १७ हजार ५०० रुपयांचा पीक विमा बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना तातडीने मंजूर करावा, तसेच पीक विमा योजनेतील जुने जोखीम स्तर पूर्ववत करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी अंबाजोगाई तालुक्यातील शेतकर्‍यांनी मंगळवार दि. २३ रोजी अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील बर्दापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.

रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती कमी कराव्यात, बोगस खते व लिंकिंग प्रकाराला आळा घालून खतांचा पुरवठा सुरळीत करावा, या मागण्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. जात, धर्म आणि पक्षभेद बाजूला ठेवून शेती आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी एकजूट दाखवत हजारो शेतकर्‍यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. यावेळी शेतकर्‍यांनी बैलगाडी रस्त्यावर आडवी लावत शासनाचे लक्ष वेधले.

भर उन्हात शेकडो शेतकरी महामार्गावर ठाण मांडून बसले होते. आंदोलनामुळे लातूर-अंबाजोगाई-बीड मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी यावेळी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. या आंदोलनात शेतकरी नेते अविनाश मोरे, अॅड. अजय बुरांडे, विलास बापू मोरे, सुरेश घोडके, धनाजी मदने, गोविंद मोरे, भागवतराव निकम, श्रीहरी होळकर, संजय गिराम, निलेश धुमाळ, तानाजी धुमाळ यांच्यासह अनेक शेतकरी प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांततेत पार पडलेल्या या रास्ता रोको आंदोलनानंतर प्रशासनाने शेतकर्‍यांचे निवेदन स्वीकारले.

COMMENTS