Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसआयआर मॅपिंगसाठी कागदपत्रांची सक्ती नाही;अफवांवर विश्वास ठेवू नका – शेख अब्दुल कादर

बीड : एस आय आर च्या मॅपिंग प्रक्रियेवरून नागरिकांमध्ये असलेल्या संभ्रमावर शेख अब्दुल कादर यांनी महत्त्वाची स्पष्टोक्ती दिली आहे. सध्या सुरू असलेल

श्रीरामनवमी निमित्त संगीतमय सुन्दरकाण्ड चे आयोजन
पाणीटंचाई, शेतकर्‍यांच्या प्रश्नांसंदर्भात घेतली आ.संदिप क्षीरसागरांनी आढावा बैठक; उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाई भासू नये यासाठी नियोजन करण्याच्या दिल्या प्रशासनाला सुचना
बीड जि.प.मध्ये महापुरुषांचे 12 फुटी पूर्णाकृती पुतळे उभारावेत – पप्पू कागदेफुले-शाहू-आंबेडकरांच्या पुतळ्यांची उंची वाढवावी; रिपाइंचा ठाम आग्रह

बीड : एस आय आर च्या मॅपिंग प्रक्रियेवरून नागरिकांमध्ये असलेल्या संभ्रमावर शेख अब्दुल कादर यांनी महत्त्वाची स्पष्टोक्ती दिली आहे. सध्या सुरू असलेल्या मॅपिंगच्या टप्प्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची  आवश्यकता नाही, त्यामुळे नागरिकांनी कागदपत्रे गोळा करण्यासाठी घाबरून धावपळ करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शेख अब्दुल कादर यांनी सांगितले की, सध्याची प्रक्रिया ही केवळ प्राथमिक मॅपिंग आहे. भविष्यात जेव्हा एस आय आर चा पुढचा टप्पा सुरू होईल, तेव्हाच कागदपत्रांची गरज भासू शकते. तोपर्यंत नागरिकांनी फक्त आपल्या जवळच्या बूथवरील बीएलओ यांच्याशी संपर्क साधून आपली नावनोंदणी आणि मॅपिंग पूर्ण करून घ्यावे. कागदपत्रांची चिंता नको: सध्याच्या मॅपिंगसाठी कोणतेही दस्तऐवज सादर करण्याची सक्ती नाही. त्यामुळे कागदपत्रे नाहीत म्हणून प्रक्रियेपासून लांब राहू नका.पालक आणि आजी-आजोबांच्या नावे पर्याय: ज्या तरुण मुलांचे नाव 2002 च्या यादीत नाही, परंतु 2025 च्या यादीत आहे, ते आपल्या आई-वडिलांच्या नावाद्वारे मॅपिंग करू शकतात. पालकांचे नाव नसल्यास आजी-आजोबा (दादा-दादी, नाना-नानी) यांच्या नावाद्वारेही ही प्रक्रिया पूर्ण करता येते. इतर जिल्हे किंवा राज्याचा प्रश्न नाही: तुमचे नाव बीडबाहेर किंवा दुसर्‍या राज्यात असले तरी हरकत नाही. 2025 च्या यादीत नाव असलेल्या ठिकाणी तुम्ही ’सेल्फ मॅपिंग’ किंवा ’ड अप्रोचिंग’ द्वारे नोंदणी करू शकता.मदतीसाठी संपर्क: प्रक्रियेत अडचण आल्यास एसडीपीआय चे कार्यकर्ते किंवा स्वतः शेख अब्दुल कादर यांच्याशी संपर्क साधावा.शेख अब्दुल कादर यांचा संदेश: ही केवळ सुरुवात आहे. सध्या फक्त नावनोंदणीवर भर द्या. पुढच्या टप्प्यात जेव्हा कागदपत्रांची गरज लागेल, तेव्हा त्याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. तोपर्यंत न घाबरता आपले मॅपिंग पूर्ण करा.

COMMENTS