Homeताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईत युवासेनेचा विस्तारमादळमोही सर्कलसह पाच गावांत युवासेनेच्या शाखांचे उद्घाटन; नव्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई तालुक्यात युवासेनेच्या संघटन विस्ताराला वेग आला असून मादळमोही सर्कलसह पाच

महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !
“शिवसेनेचं मुंडकं आमचा मित्रपक्षच उडवतोय!” सत्तारांच्या विधानाने महायुतीत भूकंप?
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची चपराळा अभयारण्यासह भामरागडमधील दोदराज येथे भेट



महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई तालुक्यात युवासेनेच्या संघटन विस्ताराला वेग आला असून मादळमोही सर्कलसह पाच गावांमध्ये युवासेनेच्या शाखांचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले.
संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे, युवासेना सचिव (महाराष्ट्र) किरण साळी यांच्या आदेशानुसार तसेच युवासेना मराठवाडा निरीक्षक व बीड लोकसभा संपर्क प्रमुख बाजीराव दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघटन विस्तार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत आप्पा नवले, युवासेना मराठवाडा निरीक्षक अविनाश भाऊ जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख शेखर भाऊ पवार, युवासेना जिल्हाप्रमुख सुमित भैय्या कोळपे, ज्येष्ठ नेते लिंबाजी मामा जाधव, विधानसभा प्रमुख शिवराज उगले, विधानसभा प्रमुख विक्रम भोसले, कृष्णा पवार, दादा उमप, निलेश इनकार, नवनाथ गवते, शाखाप्रमुख अंकुश मोरे यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवासेना तालुकाप्रमुख (गेवराई) बबन आप्पा मोघे यांच्या पुढाकारातून आणि संयोजनातून सावरगाव, पोखरी, मोघे वस्ती, संतुआई फाटा (कोळेकर वस्ती) आणि सिरस्मार्ग या पाच गावांमध्ये युवासेनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. सिरस्मार्ग येथे आयोजित मुख्य कार्यक्रमाला कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार निलेश इनकर यांची युवासेना उपतालुकाप्रमुख, निलेश बनसोडे यांची युवासेना शहरप्रमुख, इंदे यांची धोंडराई सर्कल प्रमुख, सोमनाथ इंगोले यांची मादळमोही सर्कल प्रमुख, सचिन आरडे यांची राजपिंपरी गणप्रमुख तसेच अमोल जिगे यांची कोळगाव गणप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक गावात युवकांना जोडून जनसंपर्क वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमास युवासेना व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS