Homeताज्या बातम्या

‘गुंगी’ गुडियाचा अर्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगावा; संग्राम जगताप यांच्या वक्तव्यावेळी झोपले होते का – काँग्रेस नेते शेख अमर

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाविषयी केलेल्या कथित वक्तव्यावर बीड येथे हर्षवर्धन सपकाळ यांचा पुतळा जाळणाऱ्या

कर्जमुक्तीसोबतच नैसर्गिक शेतीकडे वळा; शेतकऱ्यांना प्रशासनाचे आवाहन, अहिल्यानगरमध्ये नऊ हजार हेक्टरवर नैसर्गिक शेती
दादा पाटील महाविद्यालयात ‘वाचन संकल्प रयतेचा’ उपक्रमाचा उत्साहात प्रारंभ; मोबाईलचा अतिरेक टाळत पुस्तकांकडे वळण्याचा संदेश
‘कोटा एक्सलन्स’तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; नीट परीक्षेत प्रतीक खरमाटे आणि अल्फिया शेखचे दैदीप्यमान यश

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाविषयी केलेल्या कथित वक्तव्यावर बीड येथे हर्षवर्धन सपकाळ यांचा पुतळा जाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर माजी नगरसेवक शेख अमर यांनी जोरदार निशाणा साधला आहे. “संग्राम जगताप मुस्लिम समाजाविषयी वक्तव्ये करत असताना तुम्ही झोपा घेत होता का?” असा सवाल उपस्थित करत शेख अमर यांनी ‘गुंगी’ म्हणजे काय, याचा अर्थ आधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगावा, असे आव्हान दिले आहे.

आपल्या स्वतःच्या पक्षातील आमदार संग्राम जगताप मुस्लिम समाजाविषयी विष पसरवणारी वक्तव्ये करत असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गप्प का होते? मुस्लिम समाजाबद्दल तेढ निर्माण करणारे वक्तव्य करू नये. अशा वक्तव्यांवर संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि वरिष्ठ नेतृत्वाने स्पष्ट भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे, असेही शेख अमर यांनी म्हटले.

राजकारण करताना समाजा-समाजात द्वेष निर्माण होईल अशी भाषा टाळली पाहिजे. एखाद्या नेत्याच्या वक्तव्यावर इतर वेळी आक्रमक भूमिका घेणारे कार्यकर्ते आपल्या पक्षातील नेत्यांच्या वक्तव्यांवर मात्र मौन का बाळगतात? असा थेट प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला.

COMMENTS