महावितरणच्या केज ग्रामीण-1 शाखेचे कनिष्ठ अभियंता म्हणून श्री.देवा पवार यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून नव्याने रुजू झालेले कनिष्ठ अभियंता श्री

महावितरणच्या केज ग्रामीण-1 शाखेचे कनिष्ठ अभियंता म्हणून श्री.देवा पवार यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून नव्याने रुजू झालेले कनिष्ठ अभियंता श्री. देवा पवार यांचा केजच्या स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने काल सत्कार करण्यात आला.
कनिष्ठ अभियंता श्री. देवा पवार हे परभणी येथील महावितरण विभागात गेल्या 15 वर्षापासून कार्यरत होते. शासन निर्णयानुसार त्यांची बदली ही परभणी येथून लातूर परिमंडळ विभागात झाली असून केज ग्रामीण-1 च्या कनिष्ठ अभियंता श्रीमती शीतल सय्यद यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कनिष्ठ अभियंता म्हणून श्री. देवा पवार यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. दिनांक 22 जून 2026 रोजी कनिष्ठ अभियंता श्री.देवा पवार यांनी केज ग्रामीण-1 च्या कनिष्ठ अभियंता पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्या अनुषंगाने स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने नवनिर्वाचित कनिष्ठ अभियंता श्री.देवा पवार यांचा शाल, पुष्पगुच्छ देवून सन्मान करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विष्णू (दादा)मस्के, स्वाभिमानी पत्रकार संघाचे अध्यक्ष तात्या गवळी, स्वाभिमानी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संजय खळगे, प्रसिद्धी प्रमुख विनोद पवार, युवा उद्योजक शुभम मोरे, उद्योजक आश्रुबा नेहरकर यांच्यासह महावितरण कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील नागरिक उपस्थित होते.

COMMENTS