Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जालन्यात काँगे्रसच्या 7 नगरसेवकांचे निलंबन; पक्षादेश डावलल्यामुळे काँगे्रस प्रदेशाध्यक्षांकडून कारवाई

जालना : पक्षशिस्त भंग केल्याबद्दल काँग्रेसने जालना महापालिकेतील सात नगरसेवकांवर निलंबनाची कठोर कारवाई करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. पक

ओबीसी जनगणनेसाठी आंदोलनाचा इशारा : वडेट्टीवार
कर्जत नगरपंचायतीत प्रा.सतीश पाटील गटनेतेपदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; १५ पैकी ११ नगरसेवकांचा पाठिंबा
पंतप्रधान मोदींच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडलीकाँगे्रस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची टीका ; नीटवरूनही साधला निशाणा

जालना : पक्षशिस्त भंग केल्याबद्दल काँग्रेसने जालना महापालिकेतील सात नगरसेवकांवर निलंबनाची कठोर कारवाई करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. पक्षाच्या अधिकृत भूमिकेला हरताळ फासत भाजपला साथ देणार्‍या नगरसेवकांविरोधात ही धडक कारवाई करण्यात आली असून, पक्षनिष्ठेबाबत काँग्रेसने पुन्हा एकदा आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे.
महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेदरम्यान काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी पक्षादेशाला विरोध करत भाजप उमेदवारांना उघड पाठिंबा दिल्याची बाब उघड झाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत काँग्रेसने तातडीने चौकशी समिती नेमली. समितीच्या अहवालात संबंधित नगरसेवकांनी जाणीवपूर्वक पक्षशिस्त मोडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार फारूक सादिक तुंडीवाले, इमरान खान अमानुल्ला खान, फरहाना रऊफ अन्सारी, सुनील अशोक बोरडे, मयुरी दिनेश देने, रुबीना माजीद पठाण आणि अनिल अशोक तिरुखे या नगरसेवकांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. यासंदर्भातील आदेश प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले. काँग्रेसने या कारवाईतून स्पष्ट संदेश दिला आहे की, पक्षविरोधी भूमिका सहन केली जाणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींनी पक्षाच्या धोरणांचे पालन करणे बंधनकारक असून, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. यापूर्वी अंबरनाथ येथेही अशाच प्रकारे पक्षादेश मोडणार्‍यांवर कारवाई करण्यात आली होती. जालन्यातील निर्णय हा त्याच शिस्तीच्या धोरणाचा पुढचा टप्पा मानला जात आहे. या कारवाईमुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि गटबाजी पुन्हा एकदा चर्चेत आली असली, तरी पक्ष नेतृत्वाने शिस्तीच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड न करण्याचा निर्धार दर्शवला आहे. परिणामी, राज्यातील इतर भागांतील पदाधिकार्‍यांनाही पक्षनिष्ठेचा इशारा मिळाला असून, येत्या काळात अशा प्रकारच्या घटनांवर आळा घालण्यासाठी काँग्रेस अधिक सतर्क राहणार असल्याचे संकेत आहेत

COMMENTS