परळी वै. : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेले आक्षेपार्ह वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. काँग्रेसने याबाबत तातडीने जाहीर माफी म

परळी वै. : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेले आक्षेपार्ह वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. काँग्रेसने याबाबत तातडीने जाहीर माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष एजाज शेख यांनी दिला आहे.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ परळी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी परळी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष एजाज शेख यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका करत, पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर काँग्रेसची प्रतिमा मलिन झाली असल्याचा आरोप केला. संबंधित वक्तव्याबाबत जबाबदारांवर कारवाई करण्याऐवजी त्याचे समर्थन करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
यासोबतच, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयीही सातत्याने बेताल वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप करत, अशा प्रकारच्या राजकारणाचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचे एजाज शेख यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्यावरील टीकेचे राज्यभर पडसाद उमटले असून परळी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून काँग्रेसचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच काँग्रेसने माफी न मागितल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा एजाज शेख यांनी दिला.

COMMENTS