Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

युद्धाच्या छायेत सोन्या-चांदीला उतरती कळा

नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील तणाव आणि अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आ

देशभरात 6.08 कोटी मतदारांची नावे वगळली; एसआयआर अंतर्गत 9 राज्ये आणि तीन केंद्र शासित प्रदेशात मतदार संख्येत घट
सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यात प्रफुल्ल पटेलांची ‘दांडी’!
रुपयाच्या घसरणीवरून लोकसभेत खडाजंगी; देशाची आर्थिक स्थिती मजबूत, वित्तीय तूट नियंत्रणात : अर्थमंत्री सीतारामन

नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील तणाव आणि अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गुरुवारी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदली गेली असून चांदीतही विक्रमी पडझड झाली आहे. गेल्या काही आठवड्यांत सुरू असलेली ही घसरण आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर सुमारे तीन हजारांहून अधिक रुपयांनी घसरून सुमारे एक लाख छेचाळीस हजार रुपयांवर आला आहे. बुधवारी तो यापेक्षा जास्त पातळीवर होता. त्याचप्रमाणे, एक किलो चांदीच्या किमतीत तब्बल पंधरा हजार रुपयांपेक्षा अधिक घसरण होऊन ती सुमारे दोन लाख पंचवीस हजार रुपयांवर स्थिरावली आहे. गेल्या चौतीस दिवसांत सोन्याच्या किमतीत सुमारे सोळा हजार रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदी तब्बल बेचाळीस हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या सुरुवातीला सोन्याने जोरदार तेजी अनुभवली होती. वर्षअखेरीस सुमारे एक लाख तेहेतीस हजार रुपयांवर असलेला दर जानेवारीअखेर एक लाख शहात्तर हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र त्यानंतर बाजाराने उलट दिशा घेतली. सध्याच्या घसरणीनंतर सोने आपल्या सर्वोच्च पातळीपेक्षा सुमारे एकतीस हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीमध्ये तर आणखी मोठी पडझड झाली आहे. जानेवारीअखेर तीन लाख छ्याऐंशी हजार रुपयांपर्यंत गेलेली चांदी आता दोन लाख पंचवीस हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे. म्हणजेच अवघ्या दोन महिन्यांत चांदीत सुमारे दीड लाख रुपयांची घसरण झाली आहे.


घसरणीमागची कारणे
युद्ध किंवा तणावाच्या काळात गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने-चांदीकडे वळतात. मात्र यावेळी चित्र काहीसे वेगळे दिसत आहे. अनिश्‍चिततेच्या काळात गुंतवणूकदार तरलता राखण्यासाठी सोने-चांदी विकून रोख रक्कम साठवण्यास प्राधान्य देत आहेत. जानेवारीत उच्चांक गाठल्यानंतर मोठ्या गुंतवणूकदारांनी विक्री करून नफा निश्‍चित केला, त्यामुळे बाजारात पुरवठा वाढला. अमेरिकेच्या केंद्रीय बँकेच्या कठोर धोरणांमुळे मौल्यवान धातूंवरील आकर्षण काहीसे कमी झाले आहे.

COMMENTS