Homeताज्या बातम्या

११ वी उत्तीर्ण खंडित विद्यार्थ्यांना १२ वीत प्रवेश मिळावा; बीड जिल्हा ‘मुप्टा’ शिक्षक संघटनेची मागणी

बीड : २०२४ व त्यापूर्वी इयत्ता ११ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १२ वीमध्ये प्रवेश मिळून कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, अशी मागणी मुप्

नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के
चिखलीकरांच्या वाढदिवसाने भाजपात नवी राजकीय चर्चा; ’जुन्या निष्ठावंतांची’ पुन्हा एकत्र येण्याची चाहूल?
मतभेद असणं म्हणजे असंस्कृतपण नव्हे !

बीड : २०२४ व त्यापूर्वी इयत्ता ११ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १२ वीमध्ये प्रवेश मिळून कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, अशी मागणी मुप्टा शिक्षक संघटना बीड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कैलास दातखिळ, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन सादर करण्यात आले.

सन २०२४ आणि त्यापूर्वी इयत्ता अकरावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, ज्यांनी मागील वर्षी ऑफलाइन प्रवेश घेतला होता, त्यांना चालू शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता बारावीत प्रवेश मिळणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना ऑनलाइन लॉगिन आयडी उपलब्ध करून देऊन बारावीच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरावे. तसेच, यासंबंधी विद्यालय व महाविद्यालयांना आपल्या स्तरावरून योग्य ते सूचना-आदेश निर्गमित करावेत, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.

हे निवेदन मुप्टा शिक्षक संघटना बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष शरदराव मगर, जिल्हासचिव प्रा. शशिकांत जावळे आणि प्रा. रोहित डोंगरे यांनी शिक्षण उपसंचालकांना सादर केले.

COMMENTS