Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील भोंदू रिदम पांचाळला अटक; महापालिकेच्या गार्डनमध्ये करायचा अघोरी पूजा

मुंबई : मुंबईतील मालाड परिसरात अंधश्रद्धा पसरवून नागरिकांची दिशाभूल करणार्‍या रिदम पांचाळ या तथाकथित भोंदूबाबाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. स्थ

पालघरमध्ये भोंदूकडून 13 वर्षीय मुलीवर अत्याचार
अजितदादांच्या अपघाताआधी बारामतीत अघोरी पूजा; माजी आमदार अमोल मिटकरींचा पुन्हा खळबळजनक दावा
अजितदादांच्या फोटोपुढील ताटात टाचण्या टोचलेले लिंबू; अमोल मिटकरी यांनी ट्विट करत फोटो केले शेअर
बकऱ्याचे काळीज, दारु अन् स्मशानातील...; मुंबईत गार्डनमध्ये भोंदू बाबाचा  अघोरी खेळ - Marathi News | Mumbai superstition Fake Godman Arrested in  Malad for Performing Occult Rituals | TV9 ...


मुंबई : मुंबईतील मालाड परिसरात अंधश्रद्धा पसरवून नागरिकांची दिशाभूल करणार्‍या रिदम पांचाळ या तथाकथित भोंदूबाबाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक नागरिकांनी सातत्याने केलेल्या तक्रारी आणि सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे दिंडोशी पोलिसांनी ही कारवाई केली. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या वाढत्या प्रकारांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रिदम पांचाळ हा दर गुरुवारी आणि रविवारी ‘भूतबाधा दूर करण्याच्या’ नावाखाली अघोरी विधी करत असल्याची माहिती समोर आली होती. या विधींमध्ये विविध प्रकारच्या जादूटोण्याचा समावेश असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी वारंवार सूचना करूनही हा प्रकार थांबवण्यात आला नाही. विशेष म्हणजे, 4 एप्रिल रोजी या व्यक्तीने महापालिकेच्या उद्यानात मोठ्या प्रमाणावर लोकांना एकत्र बोलावून उघडपणे अघोरी पूजा केल्याचा आरोप आहे. या वेळी शेकडो लोकांच्या उपस्थितीत भूत उतरवण्याच्या नावाखाली विधी करण्यात आले. या प्रकाराचे छायाचित्र आणि दृक्चित्रे समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर हा विषय अधिक चर्चेत आला. स्थानिक नागरिकांनी या संदर्भातील पुरावे दोन आठवड्यांपूर्वीच पोलिसांकडे सुपूर्द केले होते. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. नागरिकांनी सह्यांचे निवेदन देत या प्रकारामुळे परिसरात निर्माण झालेल्या भीतीबाबतही पोलिसांचे लक्ष वेधले होते. दरम्यान, स्वतःवरील आरोपांबाबत विचारले असता, संबंधित व्यक्तीने आपण देवीची पूजा करत असल्याचा दावा केला. मात्र, पूजेसाठी वापरल्या जाणार्‍या साहित्याच्या स्वरूपावरून आणि पद्धतीवरून हा प्रकार संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मुंबईसारख्या आधुनिक आणि सुशिक्षित शहरात अशा प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी मिळत असल्याची बाब चिंताजनक मानली जात आहे. तंत्रज्ञान आणि शिक्षणाच्या प्रगतीनंतरही काही नागरिक अशा भोंदूगिरीला बळी पडत असल्याचे चित्र या घटनेतून स्पष्ट होते. सामाजिक जागृतीबरोबरच कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे. पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच आर्थिक फसवणुकीचे काही प्रकार घडले आहेत का, याचाही तपास केला जात आहे. येत्या काळात या प्रकरणात कोणती पुढील कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS