Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजितदादांच्या फोटोपुढील ताटात टाचण्या टोचलेले लिंबू; अमोल मिटकरी यांनी ट्विट करत फोटो केले शेअर

बारामती : बारामतीत घडलेल्या विमान दुर्घटनेनंतर आता या प्रकरणाला वेगळेच आणि धक्कादायक वळण मिळताना दिसत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या न

मुंबईतील भोंदू रिदम पांचाळला अटक; महापालिकेच्या गार्डनमध्ये करायचा अघोरी पूजा
पालघरमध्ये भोंदूकडून 13 वर्षीय मुलीवर अत्याचार
अजितदादांच्या अपघाताआधी बारामतीत अघोरी पूजा; माजी आमदार अमोल मिटकरींचा पुन्हा खळबळजनक दावा
Amol Mitkaris Shocking Claim; Ajit Pawar Accident Near Idol

बारामती : बारामतीत घडलेल्या विमान दुर्घटनेनंतर आता या प्रकरणाला वेगळेच आणि धक्कादायक वळण मिळताना दिसत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर शोककळा पसरलेल्या वातावरणात अघोरी पूजा आणि काळ्या जादूच्या संशयाने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे येत असताना खराब हवामान आणि दाट धुके यामुळे त्यांचे खाजगी विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या दुर्घटनेत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला.
या घटनेने राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात आला असून, अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. अनेक नेत्यांनी या चौकशीत पारदर्शकता ठेवण्याची मागणी केली आहे. या दुर्घटनेशी संबंधित एक धक्कादायक दावा पुढे आला आहे. अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत गंभीर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, बारामतीतील गोजुबावी परिसरात अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर ठेवलेल्या पूजेच्या ताटात टाचण्या टोचलेली लिंबे आढळून आली. हा प्रकार पाहून त्यांनी प्रश्‍न उपस्थित केला की, हे कोणीतरी जाणीवपूर्वक करत आहे का, की यामागे अघोरी पूजा किंवा काळ्या जादूचा प्रकार आहे? अमोल मिटकरी यांनी आणखी एक खळबळजनक दावा करत सांगितले की, अपघाताच्या आदल्या दिवशी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या बांधकाम परिसरात काही अघोरी विधी केल्याची माहिती समोर आली आहे. या दाव्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले असून, या मागे कोणता मोठा कट आहे का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया देत सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी असे नमूद केले की, या घटनेमागे काही अघोरी प्रकार किंवा नियोजित कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने निष्पक्ष तपास करून सत्य समोर आणावे, अशी त्यांची भूमिका आहे. दरम्यान, या आरोपांमुळे बारामतीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे अपघाताच्या तांत्रिक कारणांची चौकशी सुरू असताना, दुसरीकडे अघोरी पूजा आणि काळ्या जादूच्या चर्चेमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS