Homeताज्या बातम्याअहमदनगर

नामस्मरणाची शिदोरीच जीवनाला खरी दिशा देते : ह.भ.प. लोंढे

श्रीगोंदा : “जीवनात धन, संपत्ती आणि मान-सन्मान यापेक्षा सत्कर्म, सेवा व नामस्मरणाची शिदोरी गोळा करणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन हरिभक्त परायण रेवणनाथ महाराज लोंढे यांनी केले. कै. चांगुणाबाई शिवराम बनसुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमात ते बोलत होते.हरिभक्त परायण रेवणनाथ महाराज लोंढे यांनी संतश्रेष्ठ नामदेवरायांच्या अभंगातून जीवनाचे वास्तव आणि अध्यात्माचे महत्त्व अत्यंत प्रभावी शब्दांत स्पष्ट केले. कार्यक्रमाला परिसरातील भाविक, वारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना रेवणनाथ महाराज लोंढे यांनी संत नामदेवरायांचा प्रसिद्ध अभंग “यमाचे यमदंड बैसतील माथा, तेव्हा तुझा रक्षीता कोण आहे” याचे सखोल विश्लेषण केले. त्यांनी सांगितले की, संत नामदेवरायांनी आपल्या अभंगातून माणसाला जीवनातील क्षणभंगुरता आणि अध्यात्माची खरी दिशा दाखवली आहे.महाराज म्हणाले की, संत नामदेवरायांनी मृत्युलोकात अवतार घेतल्यानंतर सामान्य समाजाकडे पाहिले असता माणूस हळूहळू अध्यात्मापासून दूर जाऊन ‘अर्थ’ या पुरुषार्थामागे धावत असल्याचे त्यांना जाणवले. पैसा आला की मान-सन्मान मिळतो आणि मान आला की बळ निर्माण होते. मात्र या सर्व मोहात अडकताना माणूस ज्यांनी त्याला जन्म दिला त्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष करू लागतो, हीच समाजाची अधोगती असल्याचे त्यांनी नमूद केले.ते पुढे म्हणाले की, जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंतच धन, संपत्ती, सौंदर्य आणि प्रतिष्ठा माणसासोबत असते. मृत्यूनंतर या गोष्टींपैकी काहीही सोबत जात नाही. त्यामुळे जीवनात असताना सत्कर्म, दया, सेवा, नामस्मरण आणि पुण्याची शिदोरी गोळा करणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीने आयुष्यभर चांगले कर्म केले, समाजासाठी योगदान दिले, त्याच व्यक्तीचे पुढे पुण्यस्मरण आणि पुण्यतिथी साजरी केली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमात हरिनामाचा गजर, अभंग गायन व कीर्तनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित भाविकांनी संतविचारांचा संदेश आत्मसात करत कै. चांगुणाबाई बनसुडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

वारकरी संप्रदाय हा सर्व समाजाला घेऊन चालणारामाजी मंत्री थोरात ; संगमनेर खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात
आढळवाडी येथील हरिनाम सप्ताहाची सांगता
हिंदू धर्मकार्यासाठी वारकऱ्यांनी एकसंघ व्हावे : रामायणाचार्य हनुमंत महाराज

COMMENTS