Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा पालिकेचा दणका; बड्या थकबाकीदारांकडून कोट्यवधी वसूल

सातारा / प्रतिनिधी : सातारा नगरपालिकेने सरसकट थकबाकीदारांवर कारवाईचा दंडुका उगारला. त्यामुळे वर्षानुवर्षे थकबाकीदार असणार्‍या गर्भश्रीमंत, बड्यां

कापूसखेड मध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो दिव्यांचा झगमगाट
पांचगणी पालिका मुख्याधिकार्‍यांच्या अंगावर काळा रंग टाकून हल्ला
जवान विशाल पवार यांना अखेरचा निरोप

सातारा / प्रतिनिधी : सातारा नगरपालिकेने सरसकट थकबाकीदारांवर कारवाईचा दंडुका उगारला. त्यामुळे वर्षानुवर्षे थकबाकीदार असणार्‍या गर्भश्रीमंत, बड्यांकडून कोट्यवधींची थकबाकी वसूल झाली आहे. सातारा पालिकेचा मार्च अखेर वसूल सुमारे 17 कोटींच्यावर गेला. प्रशासकीय राजवटीत सातारा पालिकेचा महसूल वाढल्याने समाधान व्यक्त होत आहे.
सातारा नगरपालिका सर्वसाधारण सभांमध्ये नगरसेवक नेहमीच मालमत्ता कराची वसूल होत नाही, असा सूर काढायचे. थकबाकीच्या मुद्द्यावरुन वसुली विभागासह वरिष्ठ अधिकार्‍यांनाही टार्गेट केले जायचे. मात्र, वसुलीसाठी प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारला की काही नगरसेवक प्रशासनावर दबाव आणायचे. नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळे पालिकेच्या वसुलीचा डोंगर वाढत गेला होता. काही थकबाकीदारांना सत्ताधार तसेच विरोधी गटातील नगरसेवक तसेच पदाधिकारी पाठिशी घालत होते. कारवाया होवू नयेत यासाठी मदत केली जायची. तीन महिन्यांपूर्वी सातारा नगरपालिकेचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. त्यामुळे कामकाजाची संपूर्ण सूत्रे आता प्रशासनाच्या ताब्यात आहेत. मुख्याधिकारी अभिजीत बापट आणि विभाग प्रमुखांमध्ये समन्वय असल्याने नगरपालिकेचा कारभारास गती आली आहे. मालमत्ता कराची वसुली होण्यासाठी मुख्याधिकार्‍याच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी वसुली पथके नियुक्त केली. त्यांच्यासाठी खास वाहनेही उपलब्ध करुन दिली. या पथकांनी थकबाकीदारांच्या याद्या तयार करुन थकबाकी वसुलीसाठी पाठपुरावा सुरु केला. थकबाकीदारांना नोटीसा काढण्यात आल्या आहेत. काहीजणांच्या मिळकती सील करण्यात आला. नळकनेक्शन बंद करण्यात आली. नगरपालिकेने कारवाईची धडक मोहीम सुरु केल्याने अनेक थकबाकीदारांनी मिळकत कर भरण्यास सुरुवात केली. नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी कार्यालयीन सुट्टीच्या दिवशीही संबंधित विभाग सुरु ठेवून पैसे जमा करुन घेण्यात आले. गर्भश्रीमंत थकबाकीदारही कारवाईच्या रडारवर आहेत. त्यांच्याकडून कोट्यवधींची थकबाकी वसूल करण्यात आली. नगरपालिका कारवाई करत असताना नगरसेवकांनी त्यामध्ये हस्तक्षेप करणे टाळले. त्यामुळे नगरपालिकेच्या खजिन्यात वसूलीच्या माध्यमातून भर पडली. एका दिवसात 15 ते 20 लाख रुपयांनी होणारी वसुली एकेक दिवस 50 लाखांवर गेली. खाजगी कंपन्यांचे टॉवर, व्यापारी संकुले तसेच काही इमारतींची मोठी थकबाकी होती. चार ते पाच थकबाकीदारांकडून दीड कोटींहून अधिक वसुली करण्यात आली. त्यामुळे मार्च अखेर नगरपालिकेची वसुली सुमारे 17 कोटींच्यावर गेली आहे. उर्वरित थकबाकी वसुलीसाठी सातत्य राखल्यास नगरपालिकेच्या खजिन्यात भर पडण्यास मदत होणार आहे. थकबाकी वसुलीची मोहिम वर्षभर राबवावी. त्यासाठी स्वतंत्र पथके नेमावीत. त्यांच्याकडून आठवडा अहवाल घ्यावा. वसुली विभागाचाही सतत आढावा घेतल्यास थकबाकी वसूल होण्यास मदत होईल. प्रशासनाने त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
मुख्यमंत्र्यांकडे झाली होती तक्रार
सातारा शहरात पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असणारे 71 हून अधिक थकबाकीदार होते. त्यामध्ये बड्यांचा समावेश होता. शासकीय कार्यालयांकडेही लाखोंची थकबाकी असून ही सर्व थकबाकी वसूल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. नगरपालिकेने थकबाकीदारांवर कारवाई न केल्यास जन आंदोलन उभारणार असा इशारा सुशांत मोरे यांनी दिला होता. त्यांच्या रेट्यामुळे प्रशासनाने कारवाई करुन मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसूल केली. सुशांत मोरे म्हणाले, लोकशाही मार्गाने आलेली प्रशासकीय राजवट सातारकरांना दिलासा देणारी ठरत आहे. प्रशासकीय कालखंडात विना आडकाठी नागरिकांची कामे मार्गी लागत असतील तर लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे का? प्रशासनाने थकबाकी वसुलीत सातत्य ठेवले पाहिजे. उत्पन्नाचे स्त्रोत बळकट करायला हवेत, असेही मोरे यांनी बोलताना स्पष्ट केले.

COMMENTS