Homeमुंबई - ठाणेराजकारण

इराणी-रशियन तेल सवलती थांबणार; भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसमोर नवे आव्हान

नवी दिल्ली : जागतिक ऊर्जा बाजारपेठेत मोठे बदल घडवणारा निर्णय अमेरिकेकडून घेण्यात आला असून इराण आणि रशियाच्या कच्च्या तेलावरील सवलतींचा कालावधी वा

जीडीपी 6.9 तर किरकोळ महागाई 4.6 टक्के राहण्याची शक्यतारिझर्व्ह बँकेचा अंदाज ; व्याजदरात कोणतीही कपात नाही
सोने-चांदी आयातीची 15 बँकांना केंद्राची परवानगी
अमेरिकन निर्बंधांविरोधात व्हेनेझुएलात असंतोष
US Sanctions Russian Oil India Impact: भारताला झटका? रशियन तेल खरेदीसाठी  दिलेली सवलत संपली; अमेरिकेचा मोठा निर्णय! - Marathi News | Us Says Will Not  Renew Waiver Allowing India Buy Russia Iran


नवी दिल्ली : जागतिक ऊर्जा बाजारपेठेत मोठे बदल घडवणारा निर्णय अमेरिकेकडून घेण्यात आला असून इराण आणि रशियाच्या कच्च्या तेलावरील सवलतींचा कालावधी वाढवला जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. या निर्णयाचा थेट परिणाम भारताच्या तेल खरेदी धोरणावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकेचे वित्तमंत्री स्कॉट बेसेंट यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, रशियन तेलासाठी दिलेल्या सर्वसाधारण परवान्याचे तसेच इराणी तेलासाठीच्या सवलतींचे नूतनीकरण होणार नाही. यामुळे यापूर्वी सवलतीच्या आधारे समुद्रमार्गे पाठवण्यात आलेले तेल पूर्णपणे वापरले गेले असून नव्या सवलतींची शक्यता संपुष्टात आली आहे. या निर्णयामुळे अमेरिकेच्या धोरणात स्पष्ट बदल दिसून येतो. याआधी निर्बंधांमध्ये तात्पुरत्या सवलती देऊन जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा वाढवण्याचा आणि वाढत्या किमती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र आता त्या धोरणाला विराम दिला जाणार असल्याचे संकेत आहेत. भारतासाठी या सवलती अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या होत्या. होर्मुज सामुद्रधुनी परिसरातील तणाव आणि अडथळ्यांच्या पार्श्‍वभूमीवरही भारताने रशियन तेलाची खरेदी सुरू ठेवली होती. त्या काळात अनेक तेलवाहू जहाजे समुद्रात अडकून पडली होती, तरीही सवलतीमुळे पुरवठा साखळी टिकवून ठेवणे शक्य झाले. जागतिक पुरवठ्यातील अडचणींच्या काळात भारतीय शुद्धीकरण उद्योगांनी मोठ्या प्रमाणावर रशियन कच्चे तेल खरेदी केले. उपलब्ध माहितीनुसार, सुमारे तीस दशलक्ष बॅरल तेलासाठी आदेश देण्यात आले होते. देशातील प्रमुख शुद्धीकरण उद्योगांनी सुरुवातीला अमेरिकेच्या दबावामुळे रशियन कंपन्यांकडून खरेदी कमी केली होती; परंतु नंतर परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी पुन्हा मोठ्या प्रमाणावर आयात सुरू केली.

COMMENTS