Homeताज्या बातम्या

तोहिद खान हत्याप्रकरणी मुद्दा उपस्थित केल्याबद्दल आ. धनंजय मुंडे यांचे समर्थनआ. प्रकाश सोळंके यांच्या वक्तव्याचा मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनकडून निषेध

मयत तोहिद खान यांच्या हत्येचा गंभीर मुद्दा आमदार धनंजय मुंडे यांनी अधिवेशनात उपस्थित करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी केली.यावर आमदार

श्रीगोंद्यात अवैध मुरूम उत्खननाचा सुळसुळाटपर्यावरण धोक्यात, शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचा आरोप
पद्मश्री विखे पाटीलच्या १०२ विद्यार्थ्यांना नोकरी
संजीवनी पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश सुविधा केंद्र



मयत तोहिद खान यांच्या हत्येचा गंभीर मुद्दा आमदार धनंजय मुंडे यांनी अधिवेशनात उपस्थित करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी केली.
यावर आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत तोहिद खान यांचा मुद्दा उठवण्याची परवानगी कोणी दिली? असे वक्तव्य केल्याचे सांगितले जात आहे. या वक्तव्याचा मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, एखाद्या कुटुंबाने आपला आधार गमावला असताना पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. मुद्दा कोणी मांडला यापेक्षा मयत तोहिद खान यांच्या कुटुंबाला न्याय मिळणे आणि सत्य समोर येणे महत्त्वाचे आहे. जनतेचा विश्वास मिळवून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सर्व समाजातील नागरिकांसाठी समान न्यायाची भूमिका घ्यावी, ही अपेक्षा आहे. मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनने सांगितले की, पीडितांच्या न्यायासाठी फाउंडेशन पुढेही आवाज उठवत राहील.

COMMENTS