केज तालुक्यातील आनंद येथील ग्रामिण विकास प्रतिष्ठाण व स्वानंद सार्वजनिक वाचनालय, यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 जुलै 2026 रोजी महाराष्ट्राचे

केज तालुक्यातील आनंद येथील ग्रामिण विकास प्रतिष्ठाण व स्वानंद सार्वजनिक वाचनालय, यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 जुलै 2026 रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती अर्थात कृषीदिन परिसंवाद व कृषी मेळावा, शेतकरी मेळावा घेवून साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी दोन्ही संस्थेचे संस्थापक, जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड हे होते. परिसंवादात माजी सरपंच रामराजे गायकवाड, रावसाहेब जाधव,ए. बी. गायकवाड, एस. के. वैरागे यांनी सहभाग घेवून मार्गदर्शन कले. त्यानंतर कृषीमेळावा/ शेतकरी मेळावा घेण्यात आला. या वेळी ज्ञानेश्वर गायकवाड, रविंद्र गायकवाड, अमोल गायकवाड, वामन गायकवाड बिरुबापू सौदागर, बन्सीनाना गायकवाड, गौरी गायकवाड, दिव्या साबळे, कल्याणी घोगले यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे हरित क्रांतीचे प्रणेते होते, त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात कृषीदिन शासकीय/ अशासकीय पातळीवर साजरा केला जातो. त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात/ शेती आणी मातीमध्ये अनेक यशस्वी व उपयोगी असे आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रयोग केले. महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात हरितक्रांती करून शेतीक्षेत्राची उत्पादकता वाढविली, पाटबंधारे च्या माध्यमातून धरणे, मातीबांध, मातीबंधारे, दडीबंधारे, सिमेंट बंधारे, दगडीबांध, शेतात ताली टाकून पाणी आडवा, पाणी जिरवा. माती अडवा, पाणी जिरवा यासारखी शेतीपुरक कामे करून शेतीक्षेत्रात अमुलाग्र बदल घडविले. मोठ्या प्रमाणात शेतीक्षेत्रात पाणी खेळवून शेती मोठ्या प्रमाणात शेती बागायती केली,फळबागा शेतात शेतकर्यांना लावायला लावून शेतात पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. नवनवीन उत्पादकता वाढावणारे बि – बियाणे, खते, किटकनाशके शेतकर्यांना उपलब करून देवून शेतीयेत्रात उत्पादन वाढीच्या माध्यमातून क्रांती केली. सिंचनाच्या सुविधा शेतकर्यांना शेतात उपलब्ध करून दिल्या, अगदी सामुदाईक, व व्यक्तीकही विहीरी, कुपनलिका, मोटार, विज, पाईपलाईन अनुदानाच्या माध्यमातून शेतकर्यांना उपलब्ध करून दिल्या. शेतशिवार शक्य तेवढे हिरवेगार केले, शक्य तेवढी मदत शेतक-यांना, शेतीला करून मोठ्या प्रमाणात शेत – शिवार हिरवेगार केले, डोंगरावरती झाडे/ वनराई लावून शिवार व ऊजाड डोंगरेही हिरवीगार केली. एकूणच शेतक-यांच्या जिवनात क्रांती केली. शेतीची उत्पादकताही वाढविली व शेती आणि माती, पाणी, शेतकरी, कष्टकरी यांना महत्व देवून मोठ्या प्रमाणात हरित क्रांतीची कामे केली. म्हणूनच वसंतराव नाईक हे हरितक्रांतीचे प्रणेते होते असे प्रतिपादन डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले. दिनांक 30 जून 202 6 रोजी गुरु गोविंदसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली. दिनांक 28 जून 2026 रोजी रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम गौरी गायकवाड तर द्वितीय कृष्णराजे गायकवाड यांनी प्राविण्य मिळविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन संस्थेचे व ग्रंथालयाचे विश्वस्थ आनंद गायकवाड यांनी केले.

COMMENTS