Homeताज्या बातम्याबीड

साहित्य भारतीच्या प्रांतउपाध्यक्षपदी द.ल. वारे यांची निवड

अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीच्या देवगिरी प्रांताध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. सर्जेराव जिगे यांची, तर कार्याध्यक्ष

यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त व आत्मविश्वास आवश्यक – राजकिशोर मोदीश्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडून इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
रुग्णसेवक अमजद खान यांना क्रांतीवीर अशफाक उल्ला खान स्मृती मानवतावादी गौरव पुरस्कार जाहीर
तुलसी इंग्लिश स्कूलचा पदवी समारंभ उत्साहातशौर्य डोंगरेसह यूकेजीच्या विद्यार्थ्यांचा गौरव



अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीच्या देवगिरी प्रांताध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. सर्जेराव जिगे यांची, तर कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार उमेश काळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच प्रांत महामंत्रीपदी धाराशिवचे ज्येष्ठ साहित्यिक युवराज नळे यांची, तर प्रांतउपाध्यक्षपदी बीडचे रट्टाकार द. ल. वारे यांची निवड करण्यात आली.
देवगिरी प्रांत कार्यकर्त्यांची शनिवारी (दि. 9) आभासी बैठक पार पडली. या बैठकीला मराठवाडा आणि खानदेशातील शंभराहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत प्रदेश संघटनमंत्री नितीन केळकर, प्रदेश कार्याध्यक्ष शशिकांत घासकडबी तसेच प्रदेश उपाध्यक्ष प्रा. रवींद्र बेंबरे यांनी मार्गदर्शन केले. प्रांताचे माजी अध्यक्ष प्राचार्य संजीव गिरासे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रांत कार्यकारिणीची घोषणा नितीन केळकर यांनी केली. नूतन प्रांत कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष : प्रा. डॉ. सर्जेराव जिगे, कार्याध्यक्ष : उमेश काळे, प्रांत महामंत्री : युवराज नळे, उपाध्यक्ष : प्रा. डॉ. राजीव यशवंते, द. ल. वारे, कोषाध्यक्ष : डॉ. नागेश अंकुश, कार्यालय मंत्री : विलास फुटाणे, युवा विभाग : प्रा. डॉ. रमेश रावळकर, लोकसाहित्य विभाग : प्रा. डॉ. योगेश पाटील, बाल साहित्य विभाग : संगीता धारूरकर, प्रचार, प्रसिद्धी व सोशल मीडिया : प्रा. डॉ. सुहास सदाव्रते, महिला विभाग : प्रा. डॉ. उषा शर्मा, अनुराधा पत्की यावेळी साहित्य अकादमीचे सदस्य प्रा. नरेंद्र पाठक, अध्यक्ष डॉ. बळीराम गायकवाड, कार्याध्यक्ष नितीन केळकर आणि शशिकांत घासकडवी यांनी देवगिरी प्रांताच्या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.

COMMENTS