Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. शरद पवारांची रयतच्या अध्यक्षपदी फेरनिवड

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार आजारातून सावरल्यानंतर पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमात सक्रिय झाले आहेत. सातार्‍यात झालेल्य

ग्रामिण विद्यार्थ्यांचा उच्च शैक्षणिक पाया रयतमुळे मजबूत : कोल्हे
अ‍ॅड. संदीप वर्पे यांची रयतच्या मॅनेजिंग कौन्सिलवर वर्णी
शरद पवारांच्या योगदानामुळे ‘रयत’ची उंची वाढली : शिंदे  
रयत'च्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड | Saamana (सामना)

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार आजारातून सावरल्यानंतर पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमात सक्रिय झाले आहेत. सातार्‍यात झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत त्यांची संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. सन 2026 ते 2029 या कालावधीसाठी ते संस्थेचे नेतृत्व करणार आहेत. अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निर्विरोध झाली.
निवडीनंतर बोलताना शरद पवार यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचा आढावा घेत भविष्यातील वाटचालीवर भर दिला. आपण कुठे कमी पडतो आहोत, कोणत्या नव्या संकल्पना स्वीकारण्याची गरज आहे, याचा सातत्याने विचार झाला पाहिजे, असे ते म्हणाले. कर्मवीरांच्या विचारांचा आदर्श पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या सर्व सेवकांचे आभार मानले. शिक्षण क्षेत्रात बदलत्या काळानुसार नवे तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज अधोरेखित करताना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात वाढविण्याचे संकेत दिले. जग झपाट्याने बदलत आहे. नवीन संकल्पना स्वीकारल्याशिवाय प्रगती शक्य नाही. रयत शिक्षण संस्थेनेही आधुनिक तंत्रज्ञानाशी पाऊल टाकले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना यंदा मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्ती देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. संस्थेला हितचिंतकांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्याचे सांगत त्यांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांशी सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

COMMENTS