Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रयत सेवक बॅंकेस ‘बेस्ट एनपीए मॅनेजमेंट’ पुरस्कार

कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी स्थापन झालेल्या रयत सेवक बँकेने उल्लेखनीय कामगिरी करत ‘बेस्ट एनपीए मॅनेजमेंट’ पुरस्कार पटकावला आहे. पुणे येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या ‘तिसऱ्या राष्ट्रीय अर्बन को-ऑपरेटिव्ह सन्मान शिखर परिषद २०२६’मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९४० साली स्थापन केलेल्या रयत सेवक क्रेडिट सोसायटीचे आज सहकारी बँकेत रूपांतर झाले असून, बँकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षातील एकूण व्यवसाय २७६६.०९ कोटी रुपये इतका आहे. तसेच बँकेने १५ कोटी रुपयांचा नफा नोंदविला आहे. महाराष्ट्रातील २० शाखांमधून बँकेचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे.  नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज व ॲक्मे इन्फो मिडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेत मार्च २०२६ अखेरच्या कामगिरीच्या आधारे बँकेस उत्कृष्ट एनपीए व्यवस्थापनासाठी गौरविण्यात आले. यावर्षी बँकेने ढोबळ एनपीएचे प्रमाण ०.७९ टक्क्यांवरून ०.७६ टक्क्यांपर्यंत कमी केले असून निव्वळ एनपीए शून्य टक्के ठेवण्यात यश मिळवले आहे. बँकेचे चेअरमन नंदकिशोर गायकवाड यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “हा सन्मान संचालक मंडळाचे मार्गदर्शन, अधिकारी-कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि सभासदांचा विश्वास यांचे फलित आहे. बँकेने चालू वर्षात मिळवलेला हा चौथा पुरस्कार असून प्रत्येक सभासदाचा यात मोलाचा वाटा आहे.” दरम्यान, या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, चेअरमन चंद्रकांत दळवी, संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख तसेच इतर मान्यवरांनी बँकेचे अभिनंदन करत कामगिरीचे कौतुक केले आहे. 

रयतच्या उत्तर विभागाच्या ४३९ विद्यार्थ्यांना ‘एनएमएमएस’ मध्ये शिष्यवृत्ती
खा. शरद पवारांची रयतच्या अध्यक्षपदी फेरनिवड
शरद पवारांच्या योगदानामुळे ‘रयत’ची उंची वाढली : शिंदे  

कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी स्थापन झालेल्या रयत सेवक बँकेने उल्लेखनीय कामगिरी करत ‘बेस्ट एनपीए मॅनेजमेंट’ पुरस्कार पटकावला आहे. पुणे येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या ‘तिसऱ्या राष्ट्रीय अर्बन को-ऑपरेटिव्ह सन्मान शिखर परिषद २०२६’मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९४० साली स्थापन केलेल्या रयत सेवक क्रेडिट सोसायटीचे आज सहकारी बँकेत रूपांतर झाले असून, बँकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षातील एकूण व्यवसाय २७६६.०९ कोटी रुपये इतका आहे. तसेच बँकेने १५ कोटी रुपयांचा नफा नोंदविला आहे. महाराष्ट्रातील २० शाखांमधून बँकेचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे.

 नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज व ॲक्मे इन्फो मिडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेत मार्च २०२६ अखेरच्या कामगिरीच्या आधारे बँकेस उत्कृष्ट एनपीए व्यवस्थापनासाठी गौरविण्यात आले. यावर्षी बँकेने ढोबळ एनपीएचे प्रमाण ०.७९ टक्क्यांवरून ०.७६ टक्क्यांपर्यंत कमी केले असून निव्वळ एनपीए शून्य टक्के ठेवण्यात यश मिळवले आहे.

बँकेचे चेअरमन नंदकिशोर गायकवाड यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “हा सन्मान संचालक मंडळाचे मार्गदर्शन, अधिकारी-कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि सभासदांचा विश्वास यांचे फलित आहे. बँकेने चालू वर्षात मिळवलेला हा चौथा पुरस्कार असून प्रत्येक सभासदाचा यात मोलाचा वाटा आहे.”

दरम्यान, या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, चेअरमन चंद्रकांत दळवी, संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख तसेच इतर मान्यवरांनी बँकेचे अभिनंदन करत कामगिरीचे कौतुक केले आहे. 

COMMENTS