Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रतापगड कारखान्यात संस्थापक सहकार पॅनेलची एकहाती सत्ता : सर्व 21 जागांवर विजय

सभासदांनी सौरभ शिंदे यांच्या संस्थापक सहकार पॅनेलवर विश्‍वास दाखवत पुन्हा एकदा प्रतापगड कारखान्याची एकहाती सत्ता त्यांच्याकडे सोपवली आहे. तालुक्य

स्व. विनायक मेटे यांचा घातपात की अपघात? : कराडला मराठा क्रांती मोर्चाकडून श्रध्दाजंली सभा
सेल्फी पॉईंटचे आय लव्ह उरुण-इस्लामपूर करा; अन्यथा सेल्फी पॉईंट काढू : अखिल भारतीय मराठा सेवा संघ
जुन्या रागातून भैरोबा मंदिरासमोर मनसेच्या कार्यकर्त्याचा खून

सभासदांनी सौरभ शिंदे यांच्या संस्थापक सहकार पॅनेलवर विश्‍वास दाखवत पुन्हा एकदा प्रतापगड कारखान्याची एकहाती सत्ता त्यांच्याकडे सोपवली आहे. तालुक्याच्या राजकारणात प्रथमच शेतकरी सभासदांच्या हितासाठी गट-तट बाजूला करून जावळीचा सहकार टिकावा याकरीता दिग्गज नेत्यांनी एकत्रितपणे संस्थापक सहकार पॅनेलला पाठिंबा दिला होता. यामुळे संस्थापक सहकार पॅनलचा विजय निश्‍चित मानला जात होता.

मेढा / प्रतिनिधी : जावळी तालुक्यातील एकमेव प्रतापगड सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सौरभ शिंदे यांच्या संस्थापक सहकार पॅनलने दीपक पवार यांच्या कारखाना बचाव पॅनेलचा धुव्वा उडवत सर्व 21 जागा जिंकून सत्ता आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे.
जावळी तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, कारखाना बचाव पॅनेलच्या माध्यमातून दीपक पवार यांनी सौरभ शिंदे यांच्या संस्थापक सहकार पॅनेलला आव्हान दिले होते. रविवारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. सुमारे 52 टक्के मतदान झाले. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे संस्थापक सहकार पॅनलने सर्व 21 जागा जिंकून एकहाती विजय संपादन केला आहे.
मेढा येथील बाबासाहेब शिंदे आखडकर सभागृहात सोमवारी मतमोजणी झाली. या निवडणुकीत संस्थापक सहकार पॅनलचे महिला प्रतिनिधी गटातून शोभाताई प्रमोद बारटक्के, ताराबाई ज्ञानेश्‍वर पोफळे तर संस्था बिगर उत्पादक सभासद प्रतिनिधीमधून विठ्ठल विष्णू मोरे हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित 18 जागांकरिता 36 उमेदवारांनी निवडणूक लढवली. यात संस्थापक सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी 1200 पेक्षाही अधिकच्या मताधिक्याच्या फरकाने विजय मिळवला आहे.
विजयी उमेदवार : गट क्रमांक 1 : कुडाळमधून राजेंद्र रामचंद्र शिंदे, सौरभ राजेंद्र शिंदे व सुनेत्रा राजेंद्र शिंदे. गट क्रमांक 2 : खर्शी – सायगावमधून आनंदराव सदाशिव मोहिते, शांताराम रामराव पवार, अंकुश यादवराव शिवणकर. गट क्रमांक 3: हुमगावमधून रामदास निवृत्ती पार्टे, आनंदराव मानसिंग शिंदे, प्रदीप मारुती तरडे. गट क्रमांक 4 मेढामधून आनंदराव हरिबा जुनघरे, शिवाजीराव साहेबराव मर्ढेकर, बाळासो गणपत निकम गट क्रमांक 5 महाबळेश्‍वरमधून रामचंद्र गणपत पार्टे, जयवंत ऊर्फ नानासाहेब जनार्धन सावंत, दिलीप यशवंत वांगडे तर अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी म्हणून बाळकृष्ण लक्ष्मण निकम, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गातून कुसुम लक्ष्मण गिरीगोसावी व इतर मागास प्रवर्गमधून विजय महादेव शेवते या संस्थापक सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी एकहाती विजय मिळवला आहे.

COMMENTS