Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शून्य सावली दिवस : वैज्ञानिक घटना समजून घ्या; अंधानुकरण टाळा – डॉ. वैद्य

नांदेड : आज दि. 6 मे रोजी अनुभवता येणारा शून्य सावली दिवस हा एक रोचक खगोलशास्त्रीय प्रयोग असला, तरी त्याकडे अंधानुकरणाने किंवा धोकादायक प्रयोग म्

नेमकं महावितरणचं पाणी मुरतंय कुठं?बेजबाबदार कारभारामुळे नांदेडकर हैराण; वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा, नागरिकांचा संताप शिगेला
अवकाळी पावसाने नांदेड शहराला झोडपले; रस्ते जलमय, होर्डिंग्ज कोसळली, वीजपुरवठा खंडित
आ.रोहित पवारांचे महावितरणसमोर ठिय्या आंदोलन; कार्टमधे वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांना कोंडाण्याचा इशारा

नांदेड : आज दि. 6 मे रोजी अनुभवता येणारा शून्य सावली दिवस हा एक रोचक खगोलशास्त्रीय प्रयोग असला, तरी त्याकडे अंधानुकरणाने किंवा धोकादायक प्रयोग म्हणून पाहू नये, असा इशारा डॉ. हंसराज वैद्य यांनी दिला आहे. विष प्राशन करून विषयाची परीक्षा पाहू नका; त्याचप्रमाणे प्रखर उन्हात उभे राहून प्रयोग करण्याचे धाडस टाळा, असे त्यांनी स्पष्ट केले.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता, शून्य सावली दिवस ही घटना पृथ्वीच्या अक्षाचा सुमारे 23.5 अंशांचा झुकाव आणि सूर्याच्या प्रत्यक्ष आकाशातील भ्रमणाशी संबंधित आहे. वर्षभरात सूर्याचे आभासी स्थान उत्तरायण आणि दक्षिणायण मार्गाने बदलत राहते. याच प्रक्रियेत, कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशांमध्ये वर्षातून दोनदा असा क्षण येतो, जेव्हा सूर्य नेमका डोक्यावर (ूशपळींह िेीळींळेप) येतो. या क्षणी उभ्या वस्तूची सावली तिच्याच पायाखाली अत्यंत लहान होते किंवा काही सेकंदांसाठी जवळजवळ अदृश्य झाल्यासारखी वाटते. नांदेड परिसरात 6 मे रोजी दुपारी साधारण 12 वाजून 29 मिनिटांनी सुमारे 50-60 सेकंदांसाठी हा अनुभव घेता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली आहे. तथापि, दररोज दुपारी बारा वाजता सावली नाहीशी होते हा समज पूर्णतः चुकीचा आहे. ही घटना अत्यंत विशिष्ट भौगोलिक स्थान आणि तारखांवर अवलंबून असते. त्यामुळे याकडे वैज्ञानिक कुतूहल म्हणून पाहणे आवश्यक आहे. दरम्यान, सध्या राज्यात तीव्र उष्णतेची लाट असून उष्माघाताचा धोका वाढलेला आहे. अशा परिस्थितीत भर दुपारी उन्हात उभे राहणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते. म्हणून नागरिकांनी, विशेषतः विद्यार्थी व पालकांनी, या घटनेचा अभ्यास करताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेवटी, विज्ञान समजून घेणे महत्त्वाचे असले तरी ते विवेकाने आणि सुरक्षिततेच्या चौकटीत राहूनच अनुभवावे, असा संदेश डॉ. वैद्य यांनी दिला.

COMMENTS