Homeताज्या बातम्या

केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग! पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; बंडखोरांसह नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

नवी दिल्ली: केद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जा

नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागात कोट्यवधींच्या निधीचा फेरफार? धाराशिव-बीडच्या तंत्रनिकेतनचा निधी अन्य कामांवर खर्च; अधीक्षक अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस
टाकळी प्रकरणातील आरोपींना अटक करून कारवाई करा! निष्पाप तरुणाचा मृत्यू अत्यंत वेदनादायी: खा. बजरंग सोनवणे
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पंकजाताई मुंडे यांची सांत्वनपर भेट; कै. किसनराव मोहोळ यांना वाहिली श्रद्धांजली
Amid Cabinet reshuffle buzz, PM Modi meets President Murmu - The  HinduBusinessLine

नवी दिल्ली: केद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतलेली भेट, तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाची झालेली बैठक यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विविध राज्यांतील राजकीय समीकरणे, आगामी निवडणुका आणि संसदेतील संख्याबळ मजबूत करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा; रवनीत सिंग बिट्टू यांच्या भूमिकेकडे लक्ष

केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात आला असून त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यांच्याकडे अल्पसंख्याक व्यवहार तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागांची जबाबदारी होती. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्याने मंत्रिमंडळातील संभाव्य बदलांच्या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.

त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचाही राज्यसभा कार्यकाळ संपला आहे. घटनात्मक तरतुदींनुसार ते काही काळ मंत्रीपदावर राहू शकतात. मात्र, त्यांनी पंजाबच्या राजकारणात अधिक सक्रिय भूमिका घेण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘एक व्यक्ती – एक पद’ धोरण आणि नव्या सहकाऱ्यांना संधी

भाजपने संघटनात्मक आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन राखण्यासाठी ‘एक व्यक्ती – एक पद’ हे धोरण स्वीकारल्याचे मानले जाते. अलीकडेच काही नेत्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत, त्यामुळे मंत्रीपद आणि पक्षपद अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या काही नेत्यांबाबत बदल होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यांत विविध पक्षांतील काही खासदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, नव्या राजकीय सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा विचार होऊ शकतो. आगामी काळात पंजाब, उत्तर प्रदेशसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्याने, राजकीय रणनीतीचा भाग म्हणून सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

COMMENTS