Homeताज्या बातम्या

तळोजामध्ये कारने दिली 10 जणांना धडकदोघांचा मृत्यू; 8 जण जखमी, चालक घटनास्थळावरून पसार

नवी मुंबई : तळोजा परिसरात झालेल्या भीषण अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली. तळोजा येथील दहाव्या विभागात भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने रस

कोल्हार खुर्द येथे अपघात; एक मृत्यू
टाकीत उतरलेल्या चार सफाई कर्मचार्‍यांचा मृत्यू
समृद्धीवरील अपघातात सहा जणांचा मृत्यूमालवाहू वाहनाच्या धडकेनंतर घडली दुर्घटना
भयंकर! नवी मुंबईत भरधाव कारने 10 जणांना उडवलं; दोघांचा जागीच मृत्यू -  Marathi News | Navi Mumbai Taloja sector ten accident speeding car hit and  crushed 8 to 10 people on road


नवी मुंबई : तळोजा परिसरात झालेल्या भीषण अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली. तळोजा येथील दहाव्या विभागात भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने रस्त्यावरून जाणार्‍या तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर वाहनचालक वाहन घटनास्थळी सोडून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वाहन अतिवेगाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर वाहन थेट रस्त्यावर असलेल्या नागरिकांच्या अंगावर गेल्याने एकामागोमाग अनेकांना जबर धडक बसली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की काही नागरिक दूरवर फेकले गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना बाहेर काढले. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिकांच्या मदतीने सर्व जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर विशेष वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत दोन नागरिकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटविण्याचे तसेच त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. जखमींच्या प्रकृतीनुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

COMMENTS