Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यातील हजारो कर्मचारी उतरले रस्त्यावर 

एकच मिशन जुनी पेन्शन

नाशिक प्रतिनिधी - न्याय मागतो भीक नाही, सरकारची नियत ठीक नाही’, ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’, ‘पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, अशा घो

भिंगार अर्बन बँकेला यंदा 6 कोटीचा नफा ; 300 कोटी ठेवींचे उद्दिष्ट गाठण्याचा विश्‍वास व्यक्त
अजय देवगण विरोधात भीक मांगो आंदोलन
सैन्यातील 34 महिला अधिकार्‍यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नाशिक प्रतिनिधी – न्याय मागतो भीक नाही, सरकारची नियत ठीक नाही’, ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’, ‘पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, अशा घोषणांचा पाऊस पाडत गुरुवारी सकाळी जिल्हाभरातून शहरात आलेले हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरले होते.

जुनी पेन्शन’ या शिक्क्याच्या टोप्या परिधान करीत अन् घोषणांचे फलक उंचावत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली हजारो कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा-शालिमार या मार्गावर निघालेल्या या भव्य मोर्चात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषद, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर व चतुर्थ समन्वय समिती, जुनी पेन्शन हक्क संघटना आणि इतर संघटनांनीही सहभाग नोंदवला. विविध संघटनांनी वारंवार मोर्चे, आंदोलने करूनही सरकारने नवीन पेन्शन योजना (एनपीएस) बंद केलेली नाही. मात्र, सर्व कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी, याशिवाय शिक्षक, इतर खात्यांतील शासकीय कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशा मागण्या मोर्चाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आल्या

*नेत्यांचा कर्मचाऱ्यांशी संवाद* – कान्हेरे मैदानापासून निघालेला मोर्चा जिल्हा परिषदेसमोरून गंजमाळमार्गे शालिमारला पोहोचला. तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून संघटनेच्या नेत्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कर्मचाऱ्यांनी रस्त्यातच ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांची संख्या अन् वाहतुकीचा प्रश्न ध्यानात घेऊन मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यासाठी गेले. तोपर्यंत शालिमार परिसरात रस्त्यावरच ठिय्या देत मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी केली. मागण्यांच्या निवेदनावर जिल्हा समन्वय समितीचे निमंत्रक अरुण आहेर, शिक्षक समितीचे काळू बोरसे, ‘सीटू’चे उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आर. डी. निकम आणि ‘आयटक’चे राज्य सचिव राजू देसले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या संपात जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अरुण आहेर, कर्मचारी युनियनचे विजयकुमार हळदे, लिपिकवर्गीय संघटनेचे प्रमोद निरगुडे, परिचर संघटनेचे विजय शिंदे, प्रयोगशाळा वैज्ञानिकचे मधुकर आढाव, पशुसंवर्धनचे भगवान पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष विक्रम पिंगळे, कर्मचारी बँक उपाध्यक्षा मंदाकिनी पवार, कर्मचारी बँकेचे संचालक अजित आव्हाड, आरोग्य कर्मचारी विजय सोपे, औषधनिर्माण संघटनेचे विजय दराडे, लेखा कर्मचारी संघटनेचे दिनकर सांगळे, लिपिक हक्क संघटनेचे नीलेश देशमुख, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, उपाध्यक्ष प्रदीप सांगळे, विजय बढे, हिरामण शिंदे आदींसह हजारो कर्मचारी सहभागी झाले होते.

COMMENTS