Homeताज्या बातम्या

बीड पोलिसांची धडक कारवाई: कुख्यात टोळी जेरबंद; 6 लाख 79 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त

बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत धडाडीची कामगिरी करत धारूर, केज व नेकणूर परिसरातील वेगवेगळ्या गुन्ह्यांत सक्रिय असलेल्या कुख्यात गुन्हेग

छत्रपती संभाजीनगरमध्ये गुटखा माफियांची मुजोरी! FDA च्या महिला अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत जप्त केलेला ट्रक पळवला; वाळूज पोलिसांकडून दोन मुख्य आरोपींना अटक
केज-अंबाजोगाई रोडवरील लूटमार प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा; दोन दरोडेखोर जेरबंद
कुख्यात गुंड सचिन घायवळ राजस्थानातून अटकेतवेषांतर करूनही पोलिसांच्या जाळ्यात ; नऊ महिन्यांपासून फरार



बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत धडाडीची कामगिरी करत धारूर, केज व नेकणूर परिसरातील वेगवेगळ्या गुन्ह्यांत सक्रिय असलेल्या कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.  
गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती आणि सापळा पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  शिवाजी बंटेवाड यांच्या सूचनेनुसार पोउपनि महेश विघ्ने व त्यांचे पथक केज उपविभागात गुन्हेगारांचा शोध घेत होते. दरम्यान, गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, काही दिवसांपूर्वी प्रकाश उर्फ गुड्या काळे (रा. मोहा) याने आपल्या साथीदारांसह पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून (क्र. एमएच 12 एचएफ 4245) धारूर येथून रात्रीच्या वेळी शेळ्या चोरल्या होत्या आणि दोन दिवसांपूर्वी केज येथून कॉपरची चोरी केली असून, आज ती विक्री करण्यासाठी तो कळंब येथे जाणार आहे.   या माहितीच्या आधारे पोउपनि विघ्ने व त्यांच्या पथकाने मोहा गावाच्या दिशेने धाव घेतली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास हॉटेल कुलस्वामिनीपासून मोहा गावात जाणार्‍या रस्त्यावर बातमीदाराने सांगितलेल्या क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी अडवली. त्या गाडीत एकूण सहा इसम मिळून आले. मात्र, पोलिसांना पाहताच त्यातील दोन आरोपी पोलीस पार्टीला धक्का देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.   जेरबंद करण्यात आलेले मुख्य आरोपी:1) प्रकाश उर्फ गुड्या शाहाजी काळे2) शहाजी शेषेराव पवार3) संतोष बारीकराव शिंदे (सर्व रा. मोहा पारधी वस्ती, ता. कळंब, जि. धाराशिव)4) दिनेश नागनाथ काळे (रा. कुरनेनगर, ता. जि. धाराशिव) 5) महेश शिवाजी पवार (रा. मोहा, ता. कळंब)6) अशोक हिंमत शिंदे (रा. मोहा, ता. कळंब)  गुन्ह्यांची कबुली आणि जप्त मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी धारूर तालुक्यातील आडस येथील आखाड्यावर झोपलेल्या इसमाला मारहाण करून 12 शेळ्या चोरल्याची कबुली दिली. तसेच केज येथील कानडी माळी आणि मस्साजोग येथील सोलार प्लांटमधून आर्थिंग रॉड व वायर चोरी केल्याचे सांगितले. याशिवाय आपल्या साथीदारांसह नेकणूर हद्दीतील येळंबघाट येथे रात्रीच्या वेळी घरफोडी केल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. पोलिसांच्या पथकाने आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार, वाहन आणि इतर असा एकूण 6,79,400/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड, पोउपनि महेश विघ्ने, पोहवा बप्पासाहेब घोडके, जफर पठाण, दिलीप गित्ते, भागवत शेलार, दिपक खांडेकर, अर्जुन यादव, मपोहवा मुंढे, पोलीस अंमलदार अश्वीनकुमार सुरवसे आणि चापोहवा गणेश मराडे यांनी पार पाडली आहे.

COMMENTS