Homeताज्या बातम्या

पालखेड डाव्या कालव्यातून पाझर तलाव, बंधारे भरून द्या; आ. आशुतोष काळेंच्या पाटबंधारे विभागाला सूचना

कोपरगाव : पालखेड डाव्या कालव्याला सध्या ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यातून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सर्व बंधारे व पाझर तला

पेपरफुटीवर संसद ठप्प!
पत्रकार सुभाष शिंदे यांचे दुःखद निधन
संत शिरोमणी गोरोबा काका जयंतीनिमित्त नांदेडमध्ये आज भव्य शोभायात्रा; गुणवंत विद्यार्थी व समाजरत्नांचा होणार गौरव
Ashutosh Ashokrao Kale - Wikipedia

कोपरगाव : पालखेड डाव्या कालव्याला सध्या ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यातून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सर्व बंधारे व पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या. चालू वर्षी जून महिन्यात पावसाने ओढ दिली. त्यानंतर जुलैमध्ये काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली असली तरी तालुक्याच्या काही भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी भूजलपातळी खालावलेली आहे. दरम्यान, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पालखेड डाव्या कालव्याला ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यातून उक्कडगाव, तिळवणी, दहेगाव बोलका, कासली, पढेगाव, ओगदी-अंचलगाव, सावळगाव, नाटेगाव तसेच कोळ नदीवरील गोधेगाव येथील बंधारे व पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्याच्या सूचना काळे यांनी दिल्या आहेत. सध्या पाऊस सुरू असला तरी या भागातील अनेक बंधारे व पाझर तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही. आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास खरीप पिकांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्व भागातील काही गावांना उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे आताच उपलब्ध पाण्याचा योग्य पद्धतीने साठा करणे गरजेचे असल्याचे काळे यांनी म्हटले. शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर खरीप पिकांची पेरणी केली आहे. आगामी काळात पावसाने साथ न दिल्यास पिकांवर परिणाम होऊ शकतो. बंधारे व पाझर तलाव भरल्यास भूजलपातळी वाढण्यास मदत होऊन उन्हाळ्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालखेड डाव्या कालव्याला सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून पूर्व भागातील सर्व बंधारे व पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत. हे सर्व जलसाठे भरल्याशिवाय कालव्याचे पाणी बंद करू नये, अशा स्पष्ट सूचना आमदार काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या.

COMMENTS