समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना दरवर्षी प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय राज्यस्तरीय नावलौकिक पद्मपाणी

समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना दरवर्षी प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय राज्यस्तरीय नावलौकिक पद्मपाणी पुरस्कार यंदा बीड जिल्ह्यातील मादळमोही (ता. गेवराई) येथील युवा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सरपते यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट समाजकार्य, जनआंदोलने आणि विविध लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.
मिलिंद सरपते यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक प्रश्नांवर आंदोलने, निवेदने आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादी भवन ते लेडी नाला रस्ता मंजूर करून घेण्यासाठी केलेले आंदोलन आणि प्रभावी पाठपुरावा विशेष चर्चेचा विषय ठरला होता. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणून त्यांनी बीड जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग, लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध, प्रशासनावर असलेला प्रभावी वचक आणि विनम्र स्वभाव यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वत्र आदराने पाहिले जाते. त्यांच्या या निवडीमुळे बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रविवार, दि. 17 मे रोजी बीड येथे आयोजित भव्य समारंभात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मिलिंद सरपते यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
एमॅच्युअंर खो-खो असोसिएशनी बीड. यांच्यावतीने जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा चे आयोजन*.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची सन 2026-27 सालची 52 वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा सोलापूर अॅम्युचर खो खो असोसिएशनच्या मान्यतेने किरण स्पोर्ट्स सोलापूर यांच्या विद्यमाने दि. 02 ते 05 जून, 2026 या कालावधीत सोलापूर येथे आयोजित होणार आहे या स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे कुमार / मुली हे दोन्ही संघ सहभागी होणार आहेत. यासाठी बीड जिल्ह्याच्या संघ निवड करण्यासाठी दि. 19/5/2026 रोजी वार मंगळवार रोजी सकाळी 7:00 वाजता राजर्षी शाहू कन्या विद्यालय तेलगाव नाका बीड ठिकाणी एमॅच्युअंर खो-खो असोसिएश बीड यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी वयोमर्यादा कुमार-मुली 18 वर्षाखालील दि 25 ऑक्टोबर, 2008 रोजी अथवा त्यानंतर जन्मलेले कुमार मुली पाञ असतील बीड जिल्ह्याचे दोन्ही संघ निवडले जाणार आहेत. जिल्ह्याचे संघ निवडण्यासाठी निवड जिल्हा संघटनेने तज्ञ असे निवड समिती नियुक्त केली आहे ती खालील 1) श्रीमती वर्षा कछवा (धारूर) 2) श्री अंकुश गायकवाड (पाटोदा) 3) श्री भरत यादव (गेवराई) 4) श्री छत्रभुज ढेमरे (आंबेजोगाई) हे चारी सदस्य संघ निवडणार आहेत या स्पर्धेसाठी खेळाडूंनी पुढे दिलेली कागदपत्र आणणे आवश्यक आहे 1) शाळेचे ओळखपत्र 2) आधार कार्ड 3) जन्म प्रमाणपत्र 4) पासफोटो इत्यादी कागदपत्र घेऊन येणे आवश्यक आहे या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेसाठी बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघाने आणि खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आव्हान शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा.जे.पी शेळके व एमॅच्युअंर चे अध्यक्ष श्री ऋषिकेश शेळके उपाध्यक्ष श्री रमेश शिंदे , श्री विष्णू गवते, सचिव श्री विजय जाहेर कोषाध्यक्ष श्री योगेश सोळसे सहसचिव श्री मनोज जोगदंड, श्रीमती वर्षा कछवा, यांनी केले आहे

COMMENTS