Homeताज्या बातम्याबीड

परळीच्या विकासासाठी ‘दादां’च्या शिलेदाराचे मोठे पाऊल ; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेटपरळीत 48 कोटींचा काँक्रीट घोटाळा? नैसर्गिक नाले व सरस्वती नदी वाचविण्याची मागणीपाणी अडवा, पाणी जिरवाला हरताळ ; नदीत काँक्रीटीकरणाविरोधात माजी नगराध्यक्ष आक्रमकबोगस विकासकामांची चौकशी करा ; दोषींवर कारवाईची मागणीस्व. अजितदादा पवार यांच्या नावाने शैक्षणिक प्रकल्प व भव्य पुतळ्यासाठी पुढाकार – दिपक देशमुख

परळी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासह लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृती चिरंतर जपण्यासाठी माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथराव देशमुख यांनी

बीड जिल्हा शिवसेनेला मिळाला तरुण तडफदार चेहरा!इरफान कुरेशी यांची शिवसेना अल्पसंख्याक आघाडी जिल्हाप्रमुखपदी निवड
बीडमध्ये मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबवा, नागरी समस्या सोडवाभाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांची मुख्याधिकार्‍यांकडे मागणी
मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बीडमध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न



परळी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासह लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृती चिरंतर जपण्यासाठी माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथराव देशमुख यांनी गुरुवारी (दि. 14 मे) राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. सुनेत्राताई पवार यांची भेट घेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी निवेदनाद्वारे अनेक महत्त्वाच्या मागण्या सादर केल्या.
परळी शहरातील नैसर्गिक नाले आणि सरस्वती नदीच्या अस्तित्वावर घाला घालणार्‍या 48 कोटी रुपयांच्या काँक्रीटीकरण प्रकल्पाला तात्काळ स्थगिती देण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नदी व नाल्यांच्या दोन्ही बाजूंनी सिमेंट भिंती उभारणे तसेच नदीपात्र पूर्णतः काँक्रीट करण्याचा प्रस्ताव मंजूर केला असल्याचे सांगत, यामुळे जलपुनर्भरण प्रक्रिया बंद होऊन पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार असल्याची चिंता देशमुख यांनी व्यक्त केली. राज्य शासन एकीकडे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहीम राबवत असताना परळीत नद्यांच्या तळाशी काँक्रीट टाकून पाणी जिरण्याचे मार्ग बंद केले जात आहेत. हा प्रकल्प म्हणजे केवळ निधी हडपण्याचा प्रयत्न असून, पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे, असा आरोपही त्यांनी केला. मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या दर्जाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. शासकीय निधीचा योग्य वापर व्हावा, यासाठी बोगस कामांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. यावर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत कामांच्या गुणवत्तेबाबत योग्य तपास केला जाईल, असे आश्वासन दिल्याचे समजते. दरम्यान, परळी शहरात स्वर्गीय अजितदादा पवार यांचा भव्य पुतळा स्वखर्चातून उभारण्याची परवानगी देण्याची विनंतीही देशमुख यांनी केली. तसेच परळीत नव्याने मंजूर झालेल्या पशुवैद्यकीय व कृषी महाविद्यालयाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली. या सर्व मागण्यांवर पालकमंत्री आणि प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे आता संपूर्ण परळी शहराचे लक्ष लागले आहे.

COMMENTS