Homeक्रीडा

प्रा. शरद खिल्लारे यांची दक्षिण आफ्रिकेतील अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये ऐतिहासिक कामगिरी; पटकावले मानाचे ‘बिल रोवन’ पदक

बीड: सौ. के.एस.के. महाविद्यालयातील समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक प्रा. शरद खिल्लारे यांनी दक्षिण आफ्रिकेत आयोजित जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि आव

विलास घुले मृत्यू प्रकरणाचा निष्पक्ष तपास करा; दोषींवर कठोर कारवाई करा – ना. पंकजाताई मुंडे
बीड शहरात मूलभूत सुविधा देण्यासाठी 15 व्या वित्त आयोगाचा निधी खर्च व्हावा; डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह शिष्टमंडळाची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट! ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा दिमाखात शुभारंभ
दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक  Comrades Marathon या 86 किमी अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये 8 तास 45 मिनिटे (Sub-9)  वेळेत ...

बीड: सौ. के.एस.के. महाविद्यालयातील समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक प्रा. शरद खिल्लारे यांनी दक्षिण आफ्रिकेत आयोजित जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक मानल्या जाणार्‍या ‘कॉमरेड अल्ट्रा मॅरेथॉन’ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बीड जिल्ह्यातून हे मानाचे पदक मिळवणारे ते पहिले धावपटू ठरले आहेत.

८६ किलोमीटरचे अंतर ८ तास ४५ मिनिटांत पूर्ण

डरबन ते पीटरमॅरिट्झबर्ग या ऐतिहासिक मार्गावर झालेली तब्बल ८६ किलोमीटरची अत्यंत कठीण अल्ट्रा मॅरेथॉन प्रा. खिल्लारे यांनी अवघ्या ८ तास ४५ मिनिटांत पूर्ण केली. त्यांच्या या उत्कृष्ट वेळेमुळे त्यांना प्रतिष्ठेचे ‘बिल रोवन’ पदक बहाल करण्यात आले. प्रा. शरद खिल्लारे हे प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत बीडमधील श्री. कल्याण कुलकर्णी, डॉ. संजय जानवळे, डॉ. विश्वास गवते, श्री. हरी ठोंबरे, डॉ. अमोल मोराळे आणि श्री. प्रभाकर जाधव हे देखील सहभागी झाले होते; या सर्वांनीच ही स्पर्धा नियोजित वेळेत यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

“दक्षिण आफ्रिकेतील या ऐतिहासिक मार्गावर धावताना प्रत्येक किलोमीटरला एक नवीन आव्हान मिळत गेले. अनेक वर्षांची मेहनत, दररोजचा २ ते ३ तासांचा धावण्याचा कठीण सराव आणि सर्वांच्या शुभेच्छा यामुळेच ही ऐतिहासिक कामगिरी करणे शक्य झाले,” अशा भावना प्रा. खिल्लारे यांनी यशोशिखर गाठल्यानंतर व्यक्त केल्या.

प्रा. खिल्लारे यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. योगेश क्षीरसागर, सहसचिव डॉ. दीपाताई क्षीरसागर, प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर गुट्टे, डॉ. विश्वंभर देशमाने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळानकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी आणि क्रीडाप्रेमींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS