पिंपळनेर : बीड तालुक्यातील शिवणी येथे २३ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुनम महादेव सानप (वय २३, रा. शिवणी) असे
पिंपळनेर : बीड तालुक्यातील शिवणी येथे २३ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुनम महादेव सानप (वय २३, रा. शिवणी) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुनम सानप ही मागील दिवसापासून घरातून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता ५ ऑगस्ट रोजी तिच्या शेतातील विहिरीत तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ग्रामस्थांनी तातडीने याची माहिती पिंपळनेर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढून बीड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
दरम्यान, सदर घटना आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय नरवडे यांनी सांगितले की, सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही घटना आत्महत्या आहे की हत्या, हे स्पष्ट होईल. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या घटनेने शिवणी परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS