Homeताज्या बातम्या

कुंडलवाडीत सीसी रस्त्याच्या कामावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; व्यंकटेश्वर मंदिर ते पाण्याच्या टाकी रस्त्यावरून राजकारण तापले

कुंडलवाडी: शहरातील व्यंकटेश्वर मंदिर चौक ते पाण्याच्या टाकीपर्यंत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट (सीसी) रस्त्याच्या बांधकामावरून सत्ताधारी व विरोध

ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयातून दिलासा नाही; सहा खासदारांच्या विलिनीकरणावर स्थगती देण्यास नकार
गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन
युक्रेनमधील क्षेपणास्त्र हल्ल्यात चार भारतीयांचा मृत्यू; व्यापारी मालवाहू जहाजावर हल्ल्यानंतर भारताचा तीव्र निषेध
Neta Natter | Firebrands Unite To Heat Up BJP

कुंडलवाडी: शहरातील व्यंकटेश्वर मंदिर चौक ते पाण्याच्या टाकीपर्यंत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट (सीसी) रस्त्याच्या बांधकामावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलेच राजकारण रंगले असून, या मुद्द्यावर शहरात चर्चेला उधाण आले आहे.

या रस्त्याचे काम नगर परिषदेमार्फत सुरू करण्यात आले आहे. मात्र, विरोधकांनी या कामावर तीव्र आक्षेप घेत नगर प्रशासनाला निवेदन दिले आहे. सध्या अस्तित्वात असलेला रस्ता चांगल्या स्थितीत व गुळगुळीत असतानाही त्यावर नवीन सीसी रस्ता टाकला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच काम अंदाजपत्रकानुसार होत नसून निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावाही करण्यात आला आहे. जुन्या रस्त्यावरच नवीन रस्ता बांधल्यास रस्त्याची उंची वाढून दोन्ही बाजूंच्या घरांमध्ये पावसाचे तसेच नाल्याचे पाणी शिरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांशी कोणतीही चर्चा न करता काम पुढे रेटल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे.

दरम्यान, सत्ताधारी गटानेही नगर परिषदेकडे स्वतंत्र निवेदन सादर करून विरोधकांवर विकासकामात अडथळा आणल्याचा पलटवार केला आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते आणि नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीनुसारच काम हाती घेण्यात आले आहे. विरोधक केवळ राजकीय हेतूने कामाला विरोध करत असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे.

या वादामुळे शहरात तसेच सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू असून दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आता या प्रकरणात नगर प्रशासन कोणती भूमिका घेते आणि रस्त्याच्या कामाबाबत काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण कुंडलवाडीकरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS