Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परशुराम जयंती कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन

लातूर प्रतिनिधी - पुरोहीत संघर्ष समिती लातूर संघाचे जिल्हा समन्वयक वे. शा. स. राजेश देशपांडे यांच्या निवासस्थानी दि. 16 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजत

घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई सहन केली जाणार नाही : महापौर कविता मुळे
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेला देगलूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी ५५० लाभार्थ्यांना प्रशिक्षण
रस्त्यावरील कथित अतिक्रमण प्रकरण पुन्हा चर्चेत; जिल्हा परिषदेकडून चौकशीचे आदेश

लातूर प्रतिनिधी – पुरोहीत संघर्ष समिती लातूर संघाचे जिल्हा समन्वयक वे. शा. स. राजेश देशपांडे यांच्या निवासस्थानी दि. 16 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता परशुराम जंयतीची बैठक झाली. या बैठकीला अंबाजोगाईचे पुरोहीत तालुका समन्वयक वे. शा. स. दुर्गादास दमोशन गुरुजी, अशोक शेरेकर, गुरुजी मोरेश्वर, पाठक गुरुजी, ऋषीकेश कुलकर्णी, अनिल जोशी गुरुजी, वे. शा. स्. जयप्रकाश बुडुक गुरुजी, गणेश पुजारी, दर्शन देशपांडे गुरुजी, संजय सुर्यवंशी बैठकीस उपस्थित होते.
या बौठकीत परशुराम जयंती विविध उपक्रामंनी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परशुराम जयंतीनिमित्त सकाळी सबुरी हनुमान मंदिर, सीतारामनगर, लातुर या ठिकाणी साजरा करण्याचे ठरले आहे. परशुराम जयंतीला लातुरातील अन्य मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. लातुर मधील पुरोहीत बांधवानी आणि परशुराम उपासक यानी जयंतीचे कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन राजेशजी देशपाडे लातुर जिल्हा अध्यक्ष पुरोहीत संघर्ष समिती यानी केली आहे.

COMMENTS