बीड : ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आ

बीड : ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांत भव्य रक्तदान शिबिर, अनाथ मुलांना अन्नदान, शालेय साहित्य वाटप तसेच जिव्हाळा बेघर निवारण केंद्रातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसमवेत अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
रक्तदान शिबिरात ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत स्वेच्छेने रक्तदान केले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजात रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी सांगितले. यावेळी जिव्हाळा बेघर निवारण केंद्रातील अनाथ आजी-आजोबांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच जिव्हाळा केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांना अन्नदान करण्यात आले. कार्यक्रमात गायक विनोद दिनकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मातोश्री रमाई आंबेडकर यांच्यावरील प्रेरणादायी गीत सादर केले. या कार्यक्रमास जिव्हाळा बेघर निवारण केंद्राचे व्यवस्थापक राजू वंजारे, छाया मॅडम, केंद्रातील ज्येष्ठ नागरिक तसेच सुंदर वाघमारे, सूर्यकांत ठोकळ, भिंग्रेस जोगदंड, अविनाश वडमारे, वसीम शेख, राजेश वडमारे, आनंद डोंगरे, विशाल इंगोले, व इतर ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आयोजकांनी सांगितले की, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 21 प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रदान करतो. समाजातील निराधार, वंचित आणि गरजू घटकांप्रती संवेदनशीलता जपत समाजसेवेचे उपक्रम राबविणे ही सामाजिक जबाबदारी असून, रक्तदानासारख्या उपक्रमांमुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे अशा समाजहिताच्या उपक्रमांचे आयोजन पुढेही सातत्याने करण्यात येणार असल्याचे नितीन सोनवणे यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS