बीड : मौजे कुमशी ता. जि.बीड गावातील दलित वस्तीतील स्मशानभूमी कामातील अनियमितता तसेच खोटा अहवाल व निधी अपहरण प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी
बीड : मौजे कुमशी ता. जि.बीड गावातील दलित वस्तीतील स्मशानभूमी कामातील अनियमितता तसेच खोटा अहवाल व निधी अपहरण प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी पदाधिकारी यांचे वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे मा.तालुका प्रमुख किरण वाघमारे यांचे सह कुमशी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने पंचायत समिती समोर उपोषणास बसले. प्रशासनास दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की,26 जानेवारी 2026 च्या ग्रामसभेच्या ठरावात दलित वस्तीतील स्मशानभूमीच्या विकासासाठी एक लक्ष एक्याअंशी हजार आठशे अठ्ठावीस रुपये खर्च दाखवण्यात आलेला आहे.प्रत्यक्षात या स्मशानभूमीत कुठली ही विकास कामे झालेली नसून स्मशानभूमीच्या जागेवर सरपंच यांच्या जवळच्या नातेवाईकांनी अतिक्रमण करून कपाशी पिकाची लागवड केलेली आहे.मग हा विकास निधी गेला कुठे हा प्रश्न उपस्थित केला. एकूण सोळा गुंठे एवढ्या जागेचा शासकीय दस्ताऐवज असताना अंतिम संस्कारास जागाच नसल्याने मानवी देहाची मृत्यूनंतरची तरी अवहेलना थांबावी.व स्मशानभूमी भ्रष्टाचारांच्या विळख्यातून सोडवून जागेला कंपाउंड Wall करून सुसज्ज स्मशानभूमी उभारावी अशी आग्रही मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

COMMENTS