Homeताज्या बातम्या

नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची धडक कारवाई; लातूर आणि नांदेड जिल्ह्यात धाडी टाकून १ कोटी ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत व

ऑपरेशन ‘क्रॅक डाऊन’ अंतर्गत अर्धापूर-मुदखेड पोलिसांची मोठी कारवाई; ३५ गोवंश जनावरे जप्त, ४ आरोपींवर गुन्हे दाखल
नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 30 लाखांचा गुटखा जप्त, आरोपी अटकेत
’पत्रकारीते’च्या आडून जुगाराचा डाव!माजी शिक्षणाधिकार्‍यांसह बड्या धेंडांवर पोलिसांची धाड; 9 जुगारमल्ले गजाआड
What is new with the NCRB's 'Crime in India – 2020' report?

नांदेड : नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत विशेष पोलीस पथकाने लातूर आणि नांदेड जिल्ह्यात धडक कारवाई करत मटका अड्डे आणि अवैध वाळू वाहतुकीवर मोठे छापे टाकले. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी तब्बल १ कोटी ४२ लाख ७८ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, एकूण २३ आरोपींविरुद्ध ४ वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार विशेष पोलीस पथकाने ९ जून २०२६ रोजी लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील गांधी चौकात चालणाऱ्या मटका बुकीवर छापा टाकला. तेथून २८ हजार ४४० रुपयांची रोकड व मोबाईल जप्त करत ७ आरोपींना ताब्यात घेतले. दुसरी कारवाई विवेकानंद पोलीस ठाणे हद्दीतील नवीन रेणापूर नाका येथील एका शेडमध्ये करून कल्याण मटका चालवणाऱ्या ८ आरोपींना रोख रक्कम व मोबाईलसह अटक करण्यात आली.

लातूरमधील मटका अड्ड्यांवर कारवाई सुरू असतानाच, या पथकाने नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदेड-अहमदपूर रोडवरून अवैधपणे वाळू वाहून नेणाऱ्या ३ हायवा गाड्या आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ हायवा गाडी जप्त करण्यात आली. या कारवाईत ४ हायवा गाड्या आणि २० ब्रास वाळू असा एकूण १ कोटी ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ८ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पीएसआय पंकज इंगळे, प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांच्या पथकाने केली.

COMMENTS