Homeताज्या बातम्या

चंद्रशेखर नेम्मानीवार यांच्या कथित बोगस जात वैधता प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे आश्वासन; उपोषण मागे घेण्याचे जात पडताळणी समितीचे आवाहन

किनवट : वेलमापुरा येथील चंद्रशेखर रंगराव नेम्मानीवार यांनी नियमबाह्य व खोटी माहिती देऊन मिळवलेले ’ओबीसी’ जात वैधता प्रमाणपत्र रद्द करून चौकशी करण

महाघोटाळा? किनवटमध्ये दस्त नोंदणीचा काळाबाजार; ‘बाहेरील’ मालमत्तांसाठी वसुलीचे दुकान तेजीत!डव्हान्स बुकिंग ते शेजारील तालुक्यांत ‘सेटिंग’; दलालांचे जाळे नांदेडपर्यंत, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह
खाकीचा ‘धाक’ अवघ्या 24 तासांचा; ‘खर्रा’ शौकीन कंगाल, तर प्रशासनाची ‘हप्तेबाजी’ मालामाल?
अश्मयुगीन अंधार अन् प्रशासनाचा अमानुष प्रहार: अन्यायग्रस्त आदिवासी ‘आशा’ वर्करचा उपोषणाचा इशारा!
चंद्रशेखर नेम्मानीवार Archives - Lokmanthan | लोकमंथन

किनवट : वेलमापुरा येथील चंद्रशेखर रंगराव नेम्मानीवार यांनी नियमबाह्य व खोटी माहिती देऊन मिळवलेले ’ओबीसी’ जात वैधता प्रमाणपत्र रद्द करून चौकशी करण्याच्या मागणीसाठी 14 ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा तक्रारदार शिवाजी निवृत्तीराव आंधळे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सदर अर्जावर नियमानुसार चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले असून, उपोषण परावृत्त करण्याचे आवाहन केले आहे. शिवजी आंधळे यांनी 11 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले होते. या निवेदनात त्यांनी आरोप केला होता की, चंद्रशेखर नेम्मानीवार यांनी दिशाभूल करून व खोटी माहिती सादर करून ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. 22 जुलै 2026 च्या सुधारित कायद्यानुसार खोटी माहिती देऊन प्रमाणपत्र मिळवणे हा फौजदारी गुन्हा असून, समितीला या प्रकरणी सुओ मोटो (स्वयंप्रेरणेने) चौकशी करण्याचा व एफआयआर दाखल करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या तक्रार अर्जाची गंभीर दखल घेत समितीच्या उपआयुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल यांनी 11 ऑगस्ट रोजी अधिकृत पत्र देऊन माहिती दिली आहे की, चंद्रशेखर नेम्मानीवार यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या फेरचौकशी व ते रद्द करण्याबाबतचा अर्ज समितीच्या तिन्ही अधिकार्यांसमोर ठेवून नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. प्रशासनाकडून योग्य कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याने 14 ऑगस्ट 2026 पासून प्रस्तावित केलेले आमरण उपोषण करू नये व उपोषणापासून परावृत्त व्हावे.असे नमुद केले आहे. सदर पत्राची प्रत मा. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड आणि मा. पोलीस उपअधीक्षक कार्यालय, नांदेड यांना आवश्यक माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर करण्यात आली आहे. या आश्वासनानंतर आता समिती या प्रकरणावर काय कारवाई करते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS