कुंडलवाडी: देवशयनी एकादशीनिमित्त कुंडलवाडी शहरात अत्यंत भक्तिमय वातावरण निर्माण झाले. ह.भ.प. कानूपात्रा देविदास कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भ

कुंडलवाडी: देवशयनी एकादशीनिमित्त कुंडलवाडी शहरात अत्यंत भक्तिमय वातावरण निर्माण झाले. ह.भ.प. कानूपात्रा देविदास कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य हरिनाम मिरवणूक काढण्यात आली. विठ्ठल नामाच्या अखंड गजरात संपूर्ण शहर दुमदुमून गेले.
मिरवणुकीत ह.भ.प. कानूपात्रा कस्तुरे यांच्या पखवाज-टाळ संचाने अत्यंत आकर्षक सादरीकरण केले. विशेष म्हणजे लहान मुलांनी पखवाज व टाळ वाजवत तसेच फुगडी खेळत भक्तिरसाने भरलेले वातावरण निर्माण केले. त्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाने उपस्थित भाविकांची मने जिंकली.
यानंतर कुंडलवाडीचे कुलदैवत श्री कुंडलेश्वर मंदिरासमोर महिलांनी पारंपरिक पाऊल खेळ सादर केला. मंदिरात हरिपाठाचेही आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या श्रद्धेने यात सहभाग घेतला. यावेळी मंदिराच्या अर्चक शैलेजाताई आनंदराव ईनामदार, अर्चनाताई दाचावार, गंगासागर मंडगे, मंजूषा दाचावार, वानोळेताई, गंगूबाई कस्तुरे, मंजुळाबाई सलगरे, कलूबाई सलगरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व भाविक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या गजरात संपन्न झाला.

COMMENTS