Homeताज्या बातम्या

नांदेडमध्ये मुदतबाह्य औषध विक्रीप्रकरणी तोष्णीवाल मेडिकल्सवर मोठी कारवाई; विना बिल आणि विना फार्मासिस्ट सुरू होता कारभार

नांदेड : नांदेड शहरातील डॉक्टर्स लेन परिसरातील 'तोष्णीवाल मेडिकल्स' या औषध विक्री केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. मुदत

सोनईत अन्न सुरक्षा विभाग व पोलिसांची मोठी कारवाई; ५३ हजारांचा बेकायदेशीर सुगंधी तंबाखूचा साठा जप्त
आयएएस तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची धास्ती? बीडमधील अनेक नामांकित हॉटेल्सचे शटर बंद
शेगावच्या प्रसिद्ध कचोरी केंद्रावर एफडीएचा (FDA) छापा; कच्च्या मालाचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत पाठवले
nhra -

नांदेड : नांदेड शहरातील डॉक्टर्स लेन परिसरातील ‘तोष्णीवाल मेडिकल्स’ या औषध विक्री केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. मुदतबाह्य (एक्स्पायरी डेट संपलेली) औषधांची विक्री करणे, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) औषध देणे, फार्मासिस्ट अनुपस्थित असताना व्यवहार करणे तसेच ग्राहकांना बिल न देता विक्री करणे यांसारख्या गंभीर बाबी तपासणीत स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या अचानक तपासणीत संबंधित मेडिकल स्टोअरकडून ‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०’ आणि त्याअंतर्गत असलेल्या ‘नियम १९४५’ चे सर्रास उल्लंघन झाल्याचे आढळून आले. यानंतर या औषध पेढीविरुद्ध नियमानुसार कडक कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुदतबाह्य औषधांचे सेवन रुग्णांच्या आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकते, त्यामुळे अशा औषधांची विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

या कारवाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांना कठोर निर्देश दिले आहेत. औषध विक्रीच्या वेळी नोंदणीकृत पात्र फार्मासिस्ट उपस्थित असणे, प्रत्येक व्यवहाराचे अधिकृत बिल ग्राहकाला देणे आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध न देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, नागरिकांनी औषध खरेदी करताना सतर्क राहावे आणि कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) अ. तु. राठोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

COMMENTS