Homeताज्या बातम्या

पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची अंतिम मुदत 20 ऑगस्टपर्यंत वाढविली

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला

यशवंत विद्या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. पवार तर शेळके उपाध्यक्ष
नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्याला अबुधाबीचे परीक्षा केंद्र
वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून विद्यार्थ्यांनी पुढे जावे-हेमंत धानोरकरआई सेंटर प्रो: 21 डे चॅलेंज – अस्खलितपणे इंग्रजी बोलण्याचे आव्हान ; यशवंतांचा पालक सभेत गुणगौरव
About University - SRTMUN

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे. विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या विनंतीनुसार प्रथम वर्ष प्रवेशाची अंतिम मुदत 31 जुलै 2026 ऐवजी आता 20 ऑगस्ट 2026 करण्यात आली आहे. विद्यापीठाने यापूर्वी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शैक्षणिक वेळापत्रक निश्चित केले होते. त्यानुसार प्रथम वर्ष प्रवेशाची अंतिम तारीख 18 जून 2026 ते 24 जून 2026 अशी होती. तसेच मार्च 2026 मध्ये बारावीची पुरवणी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष प्रवेशासाठी 31 जुलै 2026 पर्यंत संधी देण्यात आली होती. मात्र, विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी केलेल्या विनंतीचा विचार करून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी प्रथम वर्ष प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार प्रवेशाची अंतिम तारीख आता 20 ऑगस्ट 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. याबाबत विद्यापीठाच्या शैक्षणिक नियोजन व विकास विभागाने दि.11 ऑगस्ट 2026 रोजी शुद्धीपत्रक जारी केले असून, सर्व संबंधितांनी सुधारित मुदतीची नोंद घ्यावी, असे विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे. मुदतवाढीमुळे अद्याप पदवी प्रथम वर्षासाठी प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, संबंधित विद्यार्थ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शैक्षणिक नियोजन व विकास विभागाचे उपकुलसचिव यांनी केले आहे.

COMMENTS