Homeताज्या बातम्या

हदगाव तालुक्याच्या विविध प्रश्नांसाठी महसूलमंत्री, जलसंपदामंत्री व पालकमंत्र्यांची मंत्रालयात भेट; भागवत देवसरकर यांनी दिले निवेदन

नांदेड : हदगाव तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, नागरिक, सिंचनाचे प्रलंबित प्रश्न आणि विकासात्मक मागण्यांसंदर्भात मुंबई येथे मंत्रालयात महत्त्वपूर्ण ब

नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची धडक कारवाई; लातूर आणि नांदेड जिल्ह्यात धाडी टाकून १ कोटी ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त
‘ऑपरेशन फ्लश आऊट’ला मोठे यश; नांदेड स्थानिक गुन्हे शाखेकडून आंतरजिल्हा जबरी चोरी आणि स्नॅचिंग करणारी टोळी जेरबंद, ३ गुन्हे उघड
किनवटमध्ये अजब प्रकार; भूमी अभिलेख कार्यालयाची इमारत रातोरात भुईसपाट, कोट्यवधींचा शासकीय भूखंड हडप करण्याचा डाव?

नांदेड : हदगाव तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, नागरिक, सिंचनाचे प्रलंबित प्रश्न आणि विकासात्मक मागण्यांसंदर्भात मुंबई येथे मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भारतीय जनता पार्टीचे हदगाव तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सुपूर्द केले.

या भेटीदरम्यान हदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शेतकरी बांधवांचे प्रश्न, महसूल, ग्रामविकास, कृषी आणि जलसंपदा विभागाशी संबंधित प्रलंबित कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील जनहिताचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत, अशी आग्रही मागणी यावेळी देवसरकर यांनी केली.

निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री अतुल सावे यांनी हदगाव तालुक्यातील सर्व मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित विभागाच्या वतीने तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन दिले. या भेटीमुळे हदगाव तालुक्यातील अनेक प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची चिन्हे आहेत. याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे परमेश्वर काळे, कैलास चव्हाण, दीपक पटणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS