Homeताज्या बातम्या

वारंगा येथील नयीआबादी परिसरात बॅरिकेड्स तोडून पळालेल्या इर्टिगाचा 30 किलोमीटर पाठलाग; 240 किलो कथित गोमांस जप्त

तामसा : हदगावकडून वारंग्याच्या दिशेने कथितरीत्या गोमांसाची वाहतूक करणार्‍या इर्टिगा कारचा मनाठा पोलिसांनी तब्बल 30 किलोमीटर पाठलाग करून वारंगा ये

राजधानीत गाठला कू्ररतेचा कळस
विद्यार्थ्यांच्या घासावरच चोरट्यांचा डल्लाखराब येथील जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहार चोरीला
जमिनीच्या वादातून उमापूरमध्ये शेतकर्‍याचे कडबा गांजी व टायर जाळले; वाहनांची तोडफोड, लाखोंचे नुकसानचकलंबा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल; अ‍ॅट्रॉसिटीची धमकी दिल्याचा आरोपकारवाई न झाल्यास सोमवारी शेख कुटुंबीयांचा आत्मदहनाचा इशारा
Nanded Crime Nephew kills uncle for refusing to give his daughter for  marriage | Nanded Crime : लग्नासाठी मुलगी देण्यास नकार दिल्याने भाच्याने  मामाला संपवलं, नांदेडमधील ...

तामसा : हदगावकडून वारंग्याच्या दिशेने कथितरीत्या गोमांसाची वाहतूक करणार्‍या इर्टिगा कारचा मनाठा पोलिसांनी तब्बल 30 किलोमीटर पाठलाग करून वारंगा येथील नयीआबादी परिसरात कारवाई केली. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच चालकासह एक जण वाहन रस्त्यावरच सोडून पसार झाला. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये आठ पोत्यांत बांधून ठेवलेले सुमारे 240 किलो कथित गोमांस आढळून आले. ही कारवाई रविवार, दि. 9 ऑगस्ट रोजी पहाटे 5.48 वाजता 112 क्रमांकावर मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. मनाठा पोलीस ठाण्याचे पथक पहाटेपासून सुप्रभात गस्त व पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी 112 क्रमांकावर एका नागरिकाने दूरध्वनी करून हदगावकडून वारंग्याच्या दिशेने इर्टिगा कारमधून गोमांसाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी मनाठा पाटी परिसरात बॅरिकेड्स लावून वाहन तपासणी सुरू केली. काही वेळातच संशयित इर्टिगा कार भरधाव वेगाने येताना पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने बॅरिकेड्स तोडून वाहन वारंग्याच्या दिशेने भरधाव वेगाने नेले. त्यानंतर मनाठा पोलिसांनी शासकीय वाहनातून संशयित कारचा पाठलाग सुरू केला. सुमारे 30 किलोमीटर पाठलाग केल्यानंतर वारंगा येथील नयीआबादी परिसरात चालकाने कार सोडली. त्यानंतर चालकासह कारमधील अन्य एक व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या आठ पोत्यांत बांधून ठेवलेले सुमारे 240 किलो मांस आढळून आले. पोलिसांनी मांसासह एमएच 46 बीक्यू 6435 क्रमांकाची इर्टिगा कार जप्त केली आहे. जप्त केलेल्या मांसाची अंदाजे किंमत 60 हजार रुपये, तर इर्टिगा कारची किंमत सुमारे 7 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, 112 क्रमांकावर पोलिसांना माहिती देणारे नागरिकही खासगी वाहनातून संशयित कारचा पाठलाग करीत घटनास्थळी पोहोचले होते. या प्रकरणी पोलीस शिपाई अमोल नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून मनाठा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त वाहनामध्ये एका आमदारांचे पत्र आढळल्याची माहिती समोर आली असून, या पत्रासह वाहनाच्या मालकीबाबत आणि कथित मांस वाहतुकीच्या प्रकरणाबाबत पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे. फरार चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीचा शोध सुरू असून, प्रकरणाचा पुढील तपास बिट जमादार अशोक दाढे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

COMMENTS