Homeताज्या बातम्या

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा बैठक अंबाजोगाईत संपन्नविवेकवादी विचारांचा प्रसार आणि तालुकास्तरावर शाखा विस्ताराचा संकल्प

महाअंनिस ची जिल्हा बैठक शनिवार दि 11 जुलै रोजी गुरुदेव विद्यालय मोरेवाडी अंबाजोगाई येथे दुपारी 2 ते 6 या वेळात संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस

सावधान! शिर्डीत गाडीची काच फोडून चोरी करण्याची नवी पद्धत आली समोर, साईभक्तांनी सतर्क राहण्याचे आवाहन
सीबीएससीच्या दहावीचा निकाल 20 तारखएला
जयंत पाटीलांचा जातीय अभिनिवेश, आणि…



महाअंनिस ची जिल्हा बैठक शनिवार दि 11 जुलै रोजी गुरुदेव विद्यालय मोरेवाडी अंबाजोगाई येथे दुपारी 2 ते 6 या वेळात संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाउपाध्यक्ष डी जी तांदळे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सरचिटणीस उत्तरेश्वर बिराजदार होते. मार्गदर्शक म्हणून राज्यकार्यवाह प्राचार्या सविता शेटे होत्या.
विस्तारीत राज्य कार्यकारीणी अहिल्यानगर येथे 5, 6, 7 जून रोजी संपन्न झाली होती. प्रत्येक राज्यकार्यकारीणी नंतर जिल्हा बैठक घेणे क्रमप्राप्त असते. त्यामुळे बीड जिल्हा कार्यकारीणीच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीची सुरुवात चळवळीचे गीते व अभिवादन गीताने झाली. प्रास्ताविकात जिल्हाकार्याध्यक्ष प्रदीप चव्हाण यांनी राज्यकार्यकारिणीचा अहवाल सादर केला. प्रमुख पाहुणे उतरेश्वर बिराजदार यांनी संघटनेची कार्यसंस्कृती व भूमिका मांडली. प्रतिगामी विचारांचा सामना करण्यासाठी आपण विवेकवादी माणसे तयार करावे लागतील. संविधानाला अनुसरून व लोकशाही मार्गाने आपण चिमणी ज्याप्रमाणे आग विझवण्याचा प्रयत्न करत होती त्याप्रमाणे आग विझविणार्‍याच्या इतिहासात आपली नोंद करावी लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. प्राचार्या सविता शेटे यांनी जुन्या सर्व शाखा पुनर्जिवीत कराव्या लागतील व बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा ठिकाणी शाखा निर्माण करण्याचा संकल्प केला. अध्यक्षीय भाषणात तांदळे सरांनी सर्वांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबाजोगाई शाखेचे कार्याध्यक्ष सूर्यकांत तेलंग यांनी केले. या जिल्हा बैठकीला दुसरे जिल्हा उपाध्यक्ष गणपत सौंदळे गुरुजी सुद्धा उपस्थित होते. अंबाजोगाई, बीड, परळी, वडवणी व घाटनांदूर अशा पाच शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते. ही बैठक यशस्वी होण्यासाठी गुरुदेव विद्यालयाच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले .

COMMENTS