Homeताज्या बातम्या

अंबाजोगाई तालुक्यात खून!घाटनांदूरमध्ये भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने वार करुन  तरुणाला संपवले.

अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी रात्री धक्कादायक घटना घडली. अण्णाभाऊ साठे चौकात एका 23 वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्याराने वार करून तसे

एसटीत सीट मिळवण्याची घाई बेतली जीवावर धावत्या बसखाली चिरडून प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू।लोकमंथन News२४
बी.फार्मसी कॉलेज व युनिरेवा हेल्थकेअर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह संपन्नग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मा क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध
राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोरमान्सून अधिक सक्रिय होण्याचा हवामान विभागाचे अंदाज



अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी रात्री धक्कादायक घटना घडली. अण्णाभाऊ साठे चौकात एका 23 वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्याराने वार करून तसेच दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ज्ञानेश्वर वाकडे (वय 23, रा. पट्टीवडगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, ज्ञानेश्वर वाकडे हा शनिवारी रात्री आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून घाटनांदूर येथून पट्टीवडगावकडे जात होता. अण्णाभाऊ साठे चौकात पोहोचताच काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर हल्लेखोरांनी दोघांवर अचानक तीक्ष्ण हत्यारे, दगड आणि विटांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात ज्ञानेश्वर गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे घाटनांदूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेनंतर मयत ज्ञानेश्वर वाकडे यांचे नातेवाईक अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले असून तक्रार प्रक्रिया सुरू आहे. अद्याप गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस घटनास्थळी व परिसरातील परिस्थितीचा तपास करत असून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पोलीस तपासानंतरच या हत्येचे नेमके कारण आणि आरोपींची माहिती स्पष्ट होणार आहे.

COMMENTS