Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी

अपघातातील जखमीला मदत केल्यानंतर आ.प्रा. राम शिंदेंची ग्वाही

कर्जत प्रतिनिधी ः पायाला मार लागून अपघातात गंभीर झालेल्या कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी येथील चैतन्य बाबासाहेब बिटके या रूग्णास मुख्यमंत्री सहाय्यत

राज्य सरकारच्या विरोधात सुजय विखे, राम शिंदे, शिवाजी कर्डीले बसले उपोषणाला (Video)
कर्जतमध्ये संगीतमय कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम उत्साहात
कर्जत तालुक्यातील पर्यटन विकासासाठी 4 कोटी 25 लाखांचा निधी

कर्जत प्रतिनिधी ः पायाला मार लागून अपघातात गंभीर झालेल्या कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी येथील चैतन्य बाबासाहेब बिटके या रूग्णास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. या रुग्णाला आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात आला होता.
कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी येथील चैतन्य बाबासाहेब बिटके या 15 वर्षीय मुलाचा पाडव्याच्या आदल्या दिवशी मोटारसायकल अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. सदर रूग्णावर पुण्यातील संचेती हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात आले. पायावरील शस्त्रक्रियेसाठी लाखो रूपयांचा खर्च येणार होता.बिटके यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने हा खर्च भागवायचा कसा असा प्रश्‍न चैतन्यच्या आई वडिलांसमोर उभा ठाकला होता. बिटके परिवारावर अचानक ओढवलेल्या या संकटाची माहिती माजी सरपंच दादासाहेब बिटके यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांना कळवली होती. आमदार प्रा.राम शिंदे यांनी तातडीने याची दखल घेतली.पुण्यातील संचेती हॉस्पीटलमध्ये सदर रूग्णास अ‍ॅडमिट करण्यापासून ते डिस्चार्ज मिळेपर्यंत आमदार राम शिंदे स्वता: जातीने लक्ष ठेऊन होते. सदर रूग्णासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत व्हावी, यासाठी आमदार शिंदे यांनी आपल्या कार्यालयाला पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार आमदार शिंदे यांच्या कार्यालयाकडून तातडीने पाठपुरावा करण्यात आला आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून चैतन्य बिटके या रूग्णास एक लाख रूपयांची आर्थिक मदत तातडीने प्राप्त झाली.  चैतन्य बिटके या रूग्णास नुकताच डिस्चार्ज मिळाला आहे. या रुग्णाची आमदार प्रा.राम शिंदे यांनी घरी जाऊन भेट घेतली. यावेळी आमदार शिंदे यांनी चैतन्यच्या प्रकृतीची विचारपूस केली. कोणतीही मदत लागो काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे, असा दिलासा आमदार शिंदे यांनी बिटके कुटुंबियांना दिला.त्यांच्या या शब्दांमुळे बिटके कुटूंबिय भावनिक झाले होते. यावेळी बिटके कुटुंबियांनी आमदार राम शिंदे यांचे आभार मानले. यावेळी माजी सरपंच दादासाहेब बिटके,गोविंद तांदळे, बाबासाहेब बिटके, गणेश बिटके सह आदी उपस्थित होते.

काही दिवसांपुर्वी माझ्या मुलाचा मोटारसायकल अपघात झाला होता.त्याच्यावर वेळेत चांगले उपचार झाले नसते तर त्याचा पाय कापावा लागला असता.आमदार प्रा.राम शिंदे यांनी माझ्या मुलाच्या उपचारासाठी मोठी मदत केली. त्यांच्या इतकी कोणीच मदत केली नाही.मुलाला डमीट करण्यापासून ते डिस्चार्ज मिळेपर्यंत शिंदे साहेब सतत आमच्या संपर्कात होते. रात्री अपरात्री फोन करून ते माहिती घेत मदत उपलब्ध करून देत होते.मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रूपयांची मदत तसेच दवाखान्याच्या बिलात 25 हजाराची सूट आमदार प्रा.राम शिंदे यांच्यामुळे मिळाली. त्यांनी केलेल्या मदतीमुळे माझा मुलगा आज सुखरूप आहे. माझ्या मुलाच्या उपचारासाठी आमदार प्रा.राम शिंदे साहेब देवासारखे धावून आले.त्यांचे मनापासून आभार !

COMMENTS