माचनूर कोटग्याळ रस्ता, पूल दुर्घटना, निधी मंजूर तरी काम रखडले, उपोषण आंदोलन, कुंडलवाडी बातमी, महाराष्ट्र रस्ता समस्या, पावसाळी अपघात, आमदार दुर्ल

माचनूर कोटग्याळ रस्ता, पूल दुर्घटना, निधी मंजूर तरी काम रखडले, उपोषण आंदोलन, कुंडलवाडी बातमी, महाराष्ट्र रस्ता समस्या, पावसाळी अपघात, आमदार दुर्लक्ष, प्रशासकीय निष्काळजीपणा, रस्ता बंद, विद्यार्थी गैरसोय, शंकर सामंते उपोषण, रस्ता दुरुस्ती मागणी, ब्रेकिंग न्यूज मराठी, लोक मंथन न्यूज24, रस्ते विकास, गावकरी संताप, ताज्या बातम्या, व्हायरल न्यूज मराठी, स्थानिक बातमी, जनमत अपडेट्स, बातमी लाईव्ह, महाराष्ट्र अपडेट्स, ट्रान्सफर बातमी, नागरिक समस्या, विकास कामे
कुंडलवाडी – माचनूर-कोटग्याळ-दौलापूर या मार्गावरील तीन पुलांसाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
१ ऑगस्ट रोजी पाण्याच्या प्रवाहामुळे माचनूर परिसरातील पूल वाहून गेल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून हा मार्ग पूर्णपणे बंद आहे. रस्ता व पूल वाहून गेल्यामुळे वाहनांची वाहतूक ठप्प झाली असून पायी जाणेही कठीण झाले आहे. या मार्गावरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पूल व रस्ता वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांचा दैनंदिन संपर्क प्रभावित झाला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तसेच नागरिकांना विविध कामांसाठी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्ता व पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, रस्ता तातडीने सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी कोटग्याळचे माजी सरपंच शंकर सामंते यांनी ११ ऑगस्ट रोजी उपोषणास सुरुवात केली. त्यांच्या आंदोलनाला नागरिकांचा पाठिंबा मिळत असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मार्ग पूर्ववत करावा, अशी मागणी जोर धरत आहे. निधी मंजूर असतानाही काम रखडले असल्याने आमदारांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पावसाळ्यात पुन्हा मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी पुलाचे बांधकाम तातडीने सुरू करून माचनूर-कोटग्याळ मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी शंकर शांते यांनी केली आहे.

COMMENTS