Homeताज्या बातम्या

’एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून किनवटच्या भूमीवर 12 हजार वृक्षांचे निसर्गसुंदर ’घनवन’ बहरणार

किनवट - सृष्टीचा श्वास जपणे म्हणजे मानवी जीवनाचे सौंदर्य द्विगुणीत करणे. याच उदात्त भावनेतून अन् ’हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पने

गाईला मिळाला तब्बल २ लाख २1 हजारांचा विक्रमी भाव; डीजेच्या तालावर मिरवणूक काढत गाईला निरोप!
आंदोलन हाताळण्यात भाजप अपयशी!
कर्जत न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी मंजूर करणार – पालकमंत्री विखे पाटील

किनवट – सृष्टीचा श्वास जपणे म्हणजे मानवी जीवनाचे सौंदर्य द्विगुणीत करणे. याच उदात्त भावनेतून अन् ’हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पनेचा ध्यास घेत, सामाजिक वनीकरण विभाग (नांदेड) आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने किनवटच्या कुशीत एक हिरवाईचा यज्ञ पार पडला. सुभाष नगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ लाभलेल्या 40 आरच्या निसर्गरम्य भूखंडावर तब्बल 12 हजार रोपांची लागवड करून एका देखण्या अन् दाट ’घनवनाची’ (मियावाकी जंगल) निर्मिती केली जात आहे. ’एक पेड माँ के नाम’ या भावस्पर्शी आवाहनाला प्रतिसाद देत, किनवट/माहूर विधानसभेचे आमदार भीमरावजी केराम आणि किनवट नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सुजाताताई विनोद एंड्रलवार यांच्या हस्ते या उपक्रमाचा मंगलमय शुभारंभ झाला. आईविषयीची कृतज्ञता आणि निसर्गाप्रतीचे समर्पण यांचा सुंदर संगम साधत मान्यवरांनी वृक्षारोपण केले. निसर्गाचा हा उत्सव अधिकच द्विगुणीत झाला तो उपस्थित मान्यवरांच्या मांदियाळीने. या सोहळ्याला उपनगराध्यक्ष: पठाण मोहम्मद हसन खान, सभापती: श्रीराम नेम्मानीवार, नगरसेवक व लोकप्रतिनिधी अभय महाजन, प्रशांत कोरडे (शिवसेना उ.बा.ठा. शहरप्रमुख), निसार भाटी आणि प्रभू कोल्हे तथा सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एच. संघई, वनपाल एस. बी. दासरवाड, प्रकाश सूर्यवंशी, वनरक्षक सुनील खामकर, सारिका माहुरे व राऊबाई गीते या सर्वांनी उपस्थित राहून या हरित क्रांतीला आपले पाठबळ दर्शवले. आई ही जशी आयुष्याला सावली देते, तसेच झाड हे संपूर्ण सृष्टीला जीवन देते. चला तर मग, या भूमीला पुन्हा एकदा हिरवाईचा शालू पांघरण्यासाठी अन् आपल्या आईच्या स्मृती अमर करण्यासाठी एक झाड तिच्या नावाने नक्की लावूया! असा आत्मीय संदेश देत या सोहळ्याची सांगता झाली. येत्या काळात हे साकारणारे घनवन किनवटच्या सौंदर्यात आणि पर्यावरणात एक नवा अध्याय लिहिणार यात शंका नाही.

COMMENTS